कोरोनाच्या मुकाबल्यासाठी ५० लाख रुपयांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 11:07 PM2020-04-20T23:07:51+5:302020-04-20T23:08:06+5:30

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, आलेल्या संकटाला समोरे जाण्यासाठी आपणही खारीचा वाटा उचलावा, या भावनेतून मायलॅन लॅबोरेटीज लिमिटेड कंपनीने ५० लाखांची मदत केली आहे. या मदतीचा धनादेश त्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे सुपूर्द केला.

Assistance of Rs. 5 Lakh for Corona combat | कोरोनाच्या मुकाबल्यासाठी ५० लाख रुपयांची मदत

कोरोनाच्या मुकाबल्यासाठी ५० लाख रुपयांची मदत

Next
ठळक मुद्देपुढाकार : जिल्हाधिकाऱ्यांकडे धनादेश सुपूर्द

नाशिक : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, आलेल्या संकटाला समोरे जाण्यासाठी आपणही खारीचा वाटा उचलावा, या भावनेतून मायलॅन लॅबोरेटीज लिमिटेड कंपनीने ५० लाखांची मदत केली आहे. या मदतीचा धनादेश त्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे सुपूर्द केला.
मायलॅन कंपनीच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी मांढरे यांची भेट घेऊन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५० लाखांचा धनादेश सुपूर्द केला आहे. मुख्यमंत्री सहायता निधीस मदत केल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी मायलॅन कंपनीचे आभार मानले. तसेच जिल्ह्यातील दानशूर नागरिकांनी, सामाजिक संघटनांनी मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहनही यावेळी मांढरे यांनी केले. मायलॅन कंपनीचे उपाध्यक्ष जितेंद्र खैरे म्हणाले, आमचे प्रमुख प्रमोदकुमार सिंग यांच्या प्रयत्नांमुळे आम्हाला एवढी मदत जमा करणे शक्य झाले आहे.
गेली अनेक वर्ष आमची कंपनी नाशिकमध्ये काम करीत आहे. म्हणून नाशिक जिल्ह्याला या संकटातून बाहेर काढण्यासाठी आपणही पुढाकार घ्यावा, या भावनेने आमच्या कंपनीच्या वतीने आम्ही ५० लाखांची मदत जिल्हाधिकाºयांना सुपूर्द केली आहे. यावेळी अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, नितीन गावंडे, मायलॅन कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक भगवान जाधव उपस्थित होते.

Web Title: Assistance of Rs. 5 Lakh for Corona combat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.