इनरव्हील क्लबतर्फे वृद्धाश्रमास मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 17:32 IST2020-12-28T17:32:04+5:302020-12-28T17:32:55+5:30
येवला : तालुक्यातील शिरसगाव लौकी येथील सैंगऋषी वृध्दाश्रमास इनरव्हील क्लबच्या वतीने ब्लँकेट व दोन छताचे पंखे भेट म्हणून देण्यात आले.

इनरव्हील क्लबतर्फे वृद्धाश्रमास मदत
ठळक मुद्देक्लबच्या सदस्यांनी वृध्दाश्रमास भेट देवून वृध्दांशी संवाद
येवला : तालुक्यातील शिरसगाव लौकी येथील सैंगऋषी वृध्दाश्रमास इनरव्हील क्लबच्या वतीने ब्लँकेट व दोन छताचे पंखे भेट म्हणून देण्यात आले.
क्लबच्या सदस्यांनी वृध्दाश्रमास भेट देवून वृध्दांशी संवाद साधत ही मदत केली. वृध्दाश्रमाचे संचालक नवनाथ जऱ्हाड यांनी क्लब सदस्यांचे स्वागत करून वृध्दाश्रमाबाबत माहिती दिली. या प्रसंगी क्लब अध्यक्ष सुचेता मंडलेचा, भारती पाटील, पिनल वर्मा, वसुधा गुजराथी, संगीता देहाडराय, अनिता पांढरे, सुशीला गाडे आदींसह सदस्य उपस्थित होते.