शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
2
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
3
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
4
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
5
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
6
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
7
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
8
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
9
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
10
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
11
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
12
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
13
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
14
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
15
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
16
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
17
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
18
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
19
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
20
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड

आसामचे डॉक्टर करणार ‘गजलक्ष्मी’वर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 00:25 IST

एका डोळ्याला मोतीबिंदू अन् दुसऱ्या डोळ्याला कॉर्निया झाल्याने अधूपणा आलेल्या ‘गजलक्ष्मी’ नावाच्या हत्तिणीवर उपचार करण्यासाठी आसाम आणि केरळ येथील तज्ज्ञ डॉक्टर्स नाशकात येणार आहेत. वनविभागाकडून संबंधित डॉक्टरांना गजलक्ष्मीच्या प्रकृतीची ई-मेलद्वारे माहिती देण्यात आली असून, लवकरच ते नाशकात येऊन गजलक्ष्मीवर उपचार करणार आहेत.

नाशिक : एका डोळ्याला मोतीबिंदू अन् दुसऱ्या डोळ्याला कॉर्निया झाल्याने अधूपणा आलेल्या ‘गजलक्ष्मी’ नावाच्या हत्तिणीवर उपचार करण्यासाठी आसाम आणि केरळ येथील तज्ज्ञ डॉक्टर्स नाशकात येणार आहेत. वनविभागाकडून संबंधित डॉक्टरांना गजलक्ष्मीच्या प्रकृतीची ई-मेलद्वारे माहिती देण्यात आली असून, लवकरच ते नाशकात येऊन गजलक्ष्मीवर उपचार करणार आहेत.म्हसरूळ परिसरात राहणारा एका भिक्षेकºयाकडे गजलक्ष्मीचा ताबा असून, तो तिचा वापर दारोदार भिक्षा मागण्यासाठी करीत आहे. मात्र तिच्या प्रकृतीकडे लक्ष देण्यास तो सक्षम नसल्याने असंख्य वेदनांनी व्हिवळत गजलक्ष्मी जगत आहे. तिच्या शरीरावर जागोजागी जखमा असून, तिच्या उजव्या डोळ्याला मोतीबिंदू ,तर डाव्या डोळ्याला कार्निया झाला आहे. अशात ‘लोकमत’ने ‘गजलक्ष्मीच्या व्यथा जाणिल्या कोणी?’ या नावाने मालिका प्रसिद्ध करून त्यामध्ये विव्हळणाºया गजलक्ष्मीचा मूकआक्रोश मांडला होता.  ‘लोकमत’च्या वृत्ताची वनमंत्री सुधीर मुनगंट्टीवार यांनी दखल घेऊन वनविभागाला गजलक्ष्मीवर तातडीने उपचार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार वनविभागाकडून केरळ येथील डॉ. सूर्यदास आणि आसाम, गुवाहाटी येथील डॉ. के. के. शर्मा यांच्याशी संपर्क साधला आहे. गजलक्ष्मीच्या शरीरावर असलेल्या जखमांवर उपचार करणे नाशकातच शक्य असल्याने तिच्यावर त्याबाबतचे उपचार यापूर्वीच सुरू करण्यात आले आहेत. मात्र डोळ्यांच्या उपचारासाठी या दोन्ही तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधला आहे. लवकरच डॉक्टरांचे एक शिष्टमंडळ नाशकात येऊन गजलक्ष्मीवर उपचार करणार आहे. दरम्यान, हत्तीशी बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेले ठाण्याचे आनंद शिंदे यांनी दोनदा गजलक्ष्मीची भेट घेऊन तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे. तिच्यावर तातडीने उपचार करण्याची गरज असल्याचे त्यांनीही सांगितले आहे.वनविभागाची नरमाईजोपर्यंत गजलक्ष्मीवर पूर्ण उपचार होत नाहीत, तोपर्यंत तिला भिक्षा मागण्यासाठी दारोदार फिरविले जाऊ नये असे वनविभागाकडून संबंधित भिक्षेकºयाला सांगितले होते. मात्र अशातही दवाखान्यात नेण्याच्या बहाण्याने तो भिक्षेकरी तिला दारोदार फिरविताना दिसत आहे.विशेष म्हणजे वनपालासमोरच हा संपूर्ण प्रकार घडत असताना वनविभाच्या नरमाईच्या भूमिकेबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.परवाना रद्दची मागणीसंबंधित भिक्षेकºयाकडे गजलक्ष्मीच्या मालकीचा परवाना आहे. मात्र भिक्षा मागणारा माणूस हत्ती कसा पोसणार, असा प्रश्न उपस्थित केला जात असल्याने त्याचा परवाना रद्द केला जावा, अशी मागणी शहरातील विविध संघटनांकडून केली जात आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग