नाशिकमधीलअशोक खरात प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे. भोंदू अशोक खरात याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले. या प्रकरणात आतार्यंत आठ महिलांनी त्याच्याविरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत. त्याच्याविरोधात तक्रारी देण्यासाठी अजूनही महिला पुढे येत आहेत. दरम्यान, आज खरात यांच्या पोलिस कोठडीत कोर्टाने पुन्हा वाढ केली असून आता १ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अशोक खरात याची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी पुन्हा एकदा कोठडी वाढवून देण्याची मागणी केली होती.
महिलांवरील अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या खरातचा तपास करण्यासाठी एसआयटीला अधिक कालावधीची गरज असल्याचे न्यायालयाने मान्य केले आहे.
अशोक खरातच्या पाठीशी ४० आमदार; 'ट्रायडेंट'मधून बदल्यांचे रॅकेट चालवायचा'; संजय राऊतांचा गंभीर आरोप
कोर्टात काय घडले?
अशोक खरात याला आज सकाळी ११.३० वाजता कोर्टात आमण्यात आले. न्यायमूर्ती श्रीमती एम. व्ही. भराडे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी एसआयटीचे तपासी अधिकारी किरण सूर्यवंशी आणि सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी खरातच्या तीन दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. यावेळी सरकारी पक्षाने युक्तिवाद करताना सांगितले की, आरोपी हा तपासात सहकार्य करत नाही. त्याने मोबाईलमध्ये अनेक नावे डमी किंवा कोडवर्ड मध्ये सेव्ह केली असण्याची शक्यता आहे, यामध्ये काही राजकीय व्यक्तींचाही समावेश असू शकतो. तसेच, पीडित महिलांना तो जे द्रव्य किंवा पाणी पाजत होता, त्याबाबतही सखोल तपास करायचा आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी अशोक खरात याच्या वकिलांनी कोठडीला विरोध केला. "मोबाईल जप्त केला आहे, क्लोन कॉपी मिळाली आहे, मग पुन्हा कोठडीची गरज काय? रिव्हॉल्व्हरचा परवानाही आरोपीकडे होता, असेही वकील म्हणाले. यावेळी पीडितेच्या वकीलांनी आक्षेप घेतला.
अशोक खरात याच्याविरोधात आतापर्यंत १० गुन्हे दाखल आहेत . यामधील आठ गुन्हे महिलांनी लैंगिक अत्याचाराचे केले आहेत. तर २ गुन्हे आर्थिक फसवणुकीचे आहेत. यावेळी एसआयटीने न्यायालयाला सांगितले की, या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून काही नवीन पीडित महिला आता तक्रार करण्यासाठी पुढे येत आहेत. त्याचा मोबाईल डेटा रिकव्हर करणे आणि त्याच्या जंगम मालमत्तेचा शोध घेणे अजूनही बाकी आहे, यासाठी आम्हाला त्याची पोलिस कोठडी हवी आहे. यानंतर कोर्टाने खरात याला १ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
Web Summary : Ashok Kharat's police custody extended to April 1 amid ongoing sexual assault and fraud investigations. Authorities cite non-cooperation and potential involvement of political figures. Ten cases filed against Kharat, including sexual assault and financial fraud.
Web Summary : अशोक खरात की पुलिस हिरासत यौन उत्पीड़न और धोखाधड़ी की जांच के बीच 1 अप्रैल तक बढ़ाई गई। अधिकारियों ने असहयोग और राजनीतिक हस्तियों की संभावित संलिप्तता का हवाला दिया। खरात के खिलाफ यौन उत्पीड़न और वित्तीय धोखाधड़ी सहित दस मामले दर्ज।