भोंदूबाबा अशोक खरातची पत्नी कल्पना फरार असून, एसआयटी पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने कल्पनाचे माहेर असलेल्या पाडळी (ता. सिन्नर) येथे जाऊन चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र माहेरच्यांशी कल्पना ही १६ वर्षापासून संपर्कात नाही, तिला अशोक खरात हा कधीही भेटायला येऊ देत नव्हता, असं नातेवाईकांचं म्हणणं आहे.
पारिवारिक विवाह समारंभ वैगेरे कार्यक्रमात कधीतरी कल्पनाची भेट होत असे, असे मोठ्या भावजयी मंगल शिंदे यांनी माध्यमांना सांगितले. कल्पनाचे माहेरचे नाव सुनीता शिंदे असे होते. भोंदू अशोकशी लग्न झाल्यावर कल्पनाने माहेरशी फारसा संपर्क ठेवला नव्हता. भावाला देखील कल्पना कधी भेटायला आली नाही.
"कुटुंबात वाईट घटना, मृत्यूची भीती"; खरातने लाखो रुपये उकळलेले, कवडीमोल भावात जमीन खरेदी
खरातचे कारनामे ऐकून धक्का
वडील तसेच तीन पैकी एका भावाचे निधन झाले तेव्हा देखील कल्पना भेटण्यास आली नाही, अशी माहिती मंगल शिंदे यांनी दिली. अशोक खरातचे कारनामे ऐकून धक्का बसला. अनेक जण विचारणा करताहेत, पण आम्ही गरीब आहोत. आम्हाला प्रकरणाशी देणे घेणे नाही, असे मंगला शिंदे म्हणाल्या. कल्पनाचे माहेरचे लोक तुटपुंज्या शेतीवर उदरनिर्वाह करतात.
भोंदू खरातने पुण्यात मुलीच्या नावे १ कोटी ३० लाखांचा घेतला फ्लॅट; कॅश नेटवर्कचे अनेक पैलू उघड
गुप्तधनाचा मोह, प्रगतीची आस; संकटातून बाहेर पडण्यासाठी महिला भोंदू अशोक खरातच्या जाळ्यात
खरात प्रकरणाचे मोठे सिक्रेट मुख्यमंत्र्यांना देणार - अंधारे
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचा 'लॉजिकल एण्ड' गाठण्यासाठी सर्व संबंधित पैलूंची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. काही संवेदनशील बाबी सार्वजनिकपणे मांडता येत नसल्याने हा विषय अत्यंत सावधगिरीने हाताळण्याची गरज आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भेटीची वेळ मागितली असून त्यांच्याकडे काही सिक्रेट देणार आहे, असे सुषमा अंधारे यांनी सांगितले.
Web Summary : Ashok Kharat's absconding wife, Kalpana, was reportedly prevented from visiting her family for 16 years. Relatives revealed she had limited contact, even during family events. Kharat's actions shocked them; they claim poverty and want no involvement.
Web Summary : अशोक खराट की फरार पत्नी, कल्पना को कथित तौर पर 16 वर्षों तक अपने परिवार से मिलने से रोका गया था। रिश्तेदारों ने खुलासा किया कि पारिवारिक कार्यक्रमों के दौरान भी उनका संपर्क सीमित था। खराट के कृत्यों ने उन्हें चौंका दिया; उनका दावा है कि वे गरीब हैं और कोई हस्तक्षेप नहीं चाहते।