Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 12:48 IST2026-04-08T12:47:33+5:302026-04-08T12:48:45+5:30

Ashok Kharat News : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आज जिल्हा सत्र न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडली.

Ashok Kharat remanded in judicial custody; Order to appear in court again tomorrow in a new case | Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश

Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आज जिल्हा सत्र न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडली. खरातची पोलीस कोठडी संपल्याने त्याला आज न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. न्यायालयाने आरोपीला दुसऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्याची रवानगी आता नाशिक मध्यवर्ती कारागृहात करण्यात येणार आहे. 

अशोक खरात प्रकरणाचे गांभीर्य आणि संभाव्य धोका लक्षात घेता, त्याला प्रत्यक्ष कोर्टात न आणता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून न्यायमूर्ती श्रीमती बी. ई. इचपुराणी यांच्यासमोर हजर करण्यात आले. सरकारी वकील शैलेंद्र बागडे आणि तपास अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांनी सरकारची बाजू मांडली, तर आरोपीच्या वतीने वकील सचिन भाटे यांनी काम पाहिले.

सुनावणी सुरू होताच न्यायाधीशांनी स्क्रीनवर असलेल्या आरोपीला पहिला प्रश्न विचारला, "तुझं नाव काय?". त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पार पडली. गेल्या सुनावणीत खरातला ८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती. ही मुदत आज संपल्याने त्याला कोठडीत पाठवण्याचे आदेश देण्यात आले.

पुन्हा एसआयटी कोठडीत जाणार?

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरातला दुसऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी मिळाली असून त्याला आता सेंट्रल जेलमध्ये नेले जाईल. मात्र, त्याच्याविरोधात दाखल असलेल्या तिसऱ्या गुन्ह्यात तपास करण्यासाठी एसआयटीने त्याचा ताबा मागितला आहे. न्यायालयाने हा अर्ज मंजूर केला असून उद्या (९ एप्रिल) त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे उद्या खरातला पुन्हा एकदा पोलीस कोठडी मिळण्याची दाट शक्यता आहे.

सरकारी वकील काय म्हणाले?

सुनावणीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सरकारी वकील शैलेंद्र बागडे म्हणाले की, "आरोपीला दुसऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. तिसऱ्या गुन्ह्यात त्याला ताब्यात घेण्यासाठी आम्ही अर्ज केला होता, जो कोर्टाने मंजूर केला आहे. उद्या पुन्हा त्याला न्यायालयात हजर केले जाईल."

Web Title : अशोक खरात को न्यायिक हिरासत; कल फिर कोर्ट में पेशी।

Web Summary : धोखाधड़ी के मामले में अशोक खरात को अदालत में सुनवाई के बाद न्यायिक हिरासत मिली। एसआईटी द्वारा हिरासत मांगने पर उसे कल एक और अपराध के लिए फिर से अदालत में पेश किया जाएगा।

Web Title : Ashok Kharat gets judicial custody; to appear in court again.

Web Summary : Ashok Kharat, in a fraud case, received judicial custody after a court hearing. He will be presented in court again tomorrow for another offense as SIT seeks custody.