Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 13:47 IST2026-04-05T13:29:35+5:302026-04-05T13:47:13+5:30

Ashok Kharat Case : २०२३ ते २०२५ दरम्यान नाशिकमधील पाथर्डी-गौलाने रस्त्यावरील एका भूखंडासाठी खरात यांना ८५ लाख रुपये हप्त्यांमध्ये दिल्याचे व्यावसायिकाने सांगितले. पैसे मिळाल्यानंतरही, खरात यांनी ती जमीन बर्क यांच्या नावावर हस्तांतरित केली नाही.

Ashok Kharat Case Bhondu Baba's 'Mahapratap' of 1 crore 12th case registered against Ashok Kharat; Big fraud of businessman | Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक

Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक

Ashok Kharat Case :  नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांनी भोंदूबाबा अशोक खरात याच्या विरोधात फसवणुकीचा आणखी एक गंभीर गुन्हा दाखल केला आहे. सिन्नर येथील कांदा व्यापारी विशाल बरके यांची १ कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप खरातवर ठेवण्यात आला आहे. या नवीन तक्रारीमुळे खरातवरील एकूण गुन्ह्यांची संख्या आता १२ झाली आहे.

लैंगिक शोषणापाठोपाठ आता खरातचे आर्थिक घोटाळेही समोर येत आहेत. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात ११ आणि शिर्डीत १ असे एकूण १२ गुन्हे दाखल झाल्याने खरातच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. सध्या खरात एसआयटीच्या (SIT) ताब्यात असून, पोलीस त्याच्या गुन्हेगारी साम्राज्याचा छडा लावत आहेत.

ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 

आपल्या पोलीस तक्रारीत, सिन्नरचे व्यावसायिक विशाल बरके यांनी खरातवर अनेक फसवणुकीचे आरोप केले आहेत. बरके यांच्या म्हणण्यानुसार, ही फसवणूक २०१९ मध्ये सुरू झाली. बरके यांचा आरोप आहे की, खरातने वृद्धाश्रम बांधण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून फक्त २२.२५ लाख रुपयांना एक भूखंड खरेदी केला, तर त्यावेळी त्याचे बाजारमूल्य ६० लाख रुपयांपेक्षा जास्त होते. जमीन ताब्यात घेतल्यानंतर तिथे कोणतेही वृद्धाश्रम बांधले नाही. उलट, खरातने ती जमीन आपली मुलगी सृष्टीच्या नावावर नोंदवली.

मजुरी आणि बियाणे घोटाळा

खरातने त्याला शेतीच्या कामासाठी ३० मजूर कामावर ठेवण्यास सांगितले होते, परंतु नंतर त्यांची मजुरी दिली नाही. बरके यांना स्वतःच्या खिशातून अंदाजे २.५ लाख रुपये द्यावे लागले. इतकेच नाही, तर खरातने त्यांना जास्त नफ्याचे आमिष दाखवून १५,००० रुपये किमतीच्या चिंचेच्या बिया विकल्या, ज्या नंतर निरुपयोगी ठरल्या. २०२३ ते २०२५ दरम्यान, त्यांनी नाशिकमधील पाथर्डी-गौलाने रस्त्यावरील एका भूखंडासाठी खरातला हप्त्यांमध्ये ८५ लाख रुपये दिले. पैसे मिळाल्यानंतरही, खरातने ती जमीन बरके यांच्या नावावर हस्तांतरित केली नाही, असा आरोप त्यांनी केला.

जेव्हा त्यांनी आपले पैसे आणि जमीन परत मागितली, तेव्हा खरात त्यांना धमक्या देऊ लागला, असा धक्कादायक खुलासा व्यावसायिक विशाल बरके यांनी केला. खरातने एक विशेष विधी करून अपशकुन घडवून आणून त्यांचा संपूर्ण व्यवसाय उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली होती. या भीतीमुळे व्यावसायिक बराच काळ गप्प राहिले होते.

खरात एसआयटीच्या ताब्यात

महिलांवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अशोक खरात सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, खरातच्या गैरकृत्यांचा तपशील उघड करण्यासाठी राज्य सरकारने एक विशेष तपास पथक स्थापन केले आहे.

Web Title : अशोक खरात मामला: ढोंगी बाबा का 1 करोड़ का घोटाला; नया मामला दर्ज

Web Summary : स्वयंभू गुरु अशोक खरात पर धोखाधड़ी का नया मामला दर्ज। एक व्यवसायी को झूठे बहाने से 1 करोड़ रुपये से अधिक का चूना लगाया गया। खरात के खिलाफ यह 12वीं एफआईआर है, जो पहले से ही हिरासत में है।

Web Title : Ashok Kharat Case: Fake Guru's 1 Crore Fraud; New FIR Filed

Web Summary : Self-proclaimed guru Ashok Kharat faces a new fraud case. A businessman was cheated of over ₹1 crore under false pretenses. This is the 12th FIR against Kharat, who is already in custody.