'कॅश नेटवर्क'द्वारे खरातने उभे केले आर्थिक साम्राज्य; डिजिटल पुरावा मागे न ठेवण्याबाबत विशेष दक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 08:45 IST2026-03-29T08:44:28+5:302026-03-29T08:45:19+5:30

खरात कोणताही डिजिटल पुरावा मागे न ठेवण्याबाबत विशेष दक्ष

Ashok Kharat built a financial empire through cash network | 'कॅश नेटवर्क'द्वारे खरातने उभे केले आर्थिक साम्राज्य; डिजिटल पुरावा मागे न ठेवण्याबाबत विशेष दक्ष

'कॅश नेटवर्क'द्वारे खरातने उभे केले आर्थिक साम्राज्य; डिजिटल पुरावा मागे न ठेवण्याबाबत विशेष दक्ष

नाशिक : भोंदूगिरीच्या आडून शेकडो कोटींची माया जमवणाऱ्या अशोक खरातच्या व्यवहाराचे धक्कादायक तपशील एसआयटीच्या तपासातून समोर आले आहेत. योजनाबद्ध पद्धतीने आर्थिक व्यवहार करणारा खरात कोणताही डिजिटल पुरावा मागे न ठेवण्याबाबत विशेष दक्ष असल्याचे बँक डिटेल्समधून स्पष्ट होते. यासाठी त्याने आपले 'कॅश नेटवर्क' उभे केले होते.

तपास पथकाने खरातची चार बैंक खाती तपासली असता, फिर्यादी किंवा तक्रारदारांकडून थेट ऑनलाइन व्यवहार झाल्याचे आढळले नाही. ७० टक्के व्यवहार तो कॅश स्वरूपात करीत असे.

जमीन खरेदी करताना तो स्वतःच्या किंवा पत्नीच्या नावाने खरेदी न करता पार्टनरचे नाव खरेदीखतात नमूद करीत असे. त्यामुळे एकाच्या नावे फार मोठी उलाढाल दिसत नसे. बहुतांश व्यवहार तो रोख स्वरूपातच करत असल्याने त्याच्या फसवणुकीचा माग काढणे कठीण जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

नातेवाइकांच्या खात्यांचाही तपास

खरातचा ऑफिसबॉय नीरज  जाधव याच्याही खात्यावर मोठी रक्कम वर्ग झालेली नाही, सध्या त्याच्या खात्यांमध्ये ३० ते ४० लाख रुपये शिल्लक आढळले.

नेवासा येथील एका व्यापाऱ्याची अडीच लाखांची फसवणूक करताना, खरातने धनादेश परत करून रोख रकमेची मागणी केल्याची बाब समोर आली आहे. आता भोंदू खरातच्या नातेवाइकांच्या खात्यांचाही तपास सुरू असून, त्याच्या 'कॅश नेटवर्क'मधील प्रत्येक धागा उलगडण्याचा प्रयत्न सुरू आहे.

भोंदूबाबा खरातला आज न्यायालयात हजर करणार 

अशोक खरातच्या पोलिस कोठडीची मुदत संपणार असल्याने रविवारी त्याला पुन्हा जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पोलिस कोठडी दरम्यान झालेल्या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी उघडकीस येण्याची शक्यता आहे.
 

Web Title : अशोक खरात का नकद नेटवर्क: डिजिटल निशान से बचाव, आर्थिक साम्राज्य।

Web Summary : अशोक खरात ने धोखाधड़ी से संपत्ति अर्जित की, नकद लेनदेन का उपयोग करके डिजिटल निशान से परहेज किया। जांच से पता चला कि वह शायद ही कभी ऑनलाइन हस्तांतरण का उपयोग करते थे, संपत्ति खरीद के लिए नकद और प्रॉक्सी नामों को प्राथमिकता देते थे, जिससे धोखाधड़ी का पता लगाने में बाधा आती है। पुलिस रिश्तेदारों के खातों की जांच कर रही है।

Web Title : Ashok Kharat's financial empire built on cash, avoids digital trails.

Web Summary : Ashok Kharat amassed wealth through fraudulent schemes, meticulously avoiding digital footprints by using cash transactions. Investigations reveal he rarely used online transfers, preferring cash and proxy names for property purchases, hindering fraud detection. Police are investigating relatives' accounts.