शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
2
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
3
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
4
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
5
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
6
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
7
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
8
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
9
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
10
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
11
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
12
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
13
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
14
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
15
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
17
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
18
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!
19
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
20
'कुछ कुछ होता हैं'साठी करणला मिळत नव्हती टीना; राणीपूर्वी तब्बल 8 अभिनेत्रींनी दिला होता नकार

दिव्यांगांना मिळाले कृत्रिम अवयव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 12:06 AM

सालाबादप्रमाणे यावर्षीही अखिल भारतीय मारवाडी युवा मंच नाशिक शाखेच्या वतीने दिव्यांगांसाठी घेण्यात आलेल्या शिबिरात सुमारे १०० गरजूंना कृत्रिम अवयवांचा मोफत लाभ देण्यात आला. तसेच सुमारे एक हजार नागरिकांची मोफत वैद्यकीय शारीरिक तपासणी करण्यात आली.

नाशिक : सालाबादप्रमाणे यावर्षीही अखिल भारतीय मारवाडी युवा मंच नाशिक शाखेच्या वतीने दिव्यांगांसाठी घेण्यात आलेल्या शिबिरात सुमारे १०० गरजूंना कृत्रिम अवयवांचा मोफत लाभ देण्यात आला. तसेच सुमारे एक हजार नागरिकांची मोफत वैद्यकीय शारीरिक तपासणी करण्यात आली.जैन श्वेतांबर स्थानकवासी श्रीसंघाच्या वतीने उपप्रवर्तक पंडितरत्न प्रमोदमुनिजी म. सा., डॉ. समकितमुनिजी म.सा., यांच्या सानिध्यात रविवारी (दि.२२) चोपडा बँक्वेट सभागृहात मोफत कृत्रिम अवयव प्रत्यारोपण व महाआरोग्य निदान शिबिर युवा मंचाकडून घेण्यात आले. या शिबिरासाठी तीन दिवसांपूर्वी १०० दिव्यांगांनी मंचाकडे नोंदणी केली होती. या गरजूंना कृत्रिम पाय आणि हात या अवयवांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रत्यारोपण करण्यात आल्याची माहिती मंचाचे सचिव चेतन भंडारी यांनी दिली. तसेच यावेळी महाआरोग्य शिबिरात सुमारे एक हजारांहून अधिक नागरिकांची नेत्र, दंत चिकित्सेसोबत शारीरिक वैद्यकीय तपासणी शहरातील विविध रुग्णालयांच्या डॉक्टरांकडून करण्यात आली.यामध्ये डॉ. प्रणील लोढा, डॉ. सारिका परतानी, डॉ. शरद परतानी, योगेश कोठारी यांनी सहभाग घेतला. तसेच युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी यावेळी रक्तदान केले. अर्पण रक्तपेढीच्या वतीने २०० रक्तपिशव्या संकलित करण्यात आल्या. शिबिराच्या यशस्वीतेसाठी मंचाचे अध्यक्ष तन्मय हिरण, प्रभा मुंदडा, अमित बोरा, निकिता कोठारी, पीयूष बागमार आदींनी प्रयत्न केले.आठ वर्षांपासून उपक्रममारवाडी युवा मंचाकडून २०११ सालापासून मोफत कृत्रिम अवयव प्रत्यारोपण शिबिराचा उपक्रम राबविला जात आहे. आतापर्यंत १२०० गरजू दिव्यांगांपर्यंत कृत्रिम अवयव पोहोचविण्यास मंचाला यश आल्याचे चेतन भंडारी यांनी सांगितले. यंदाचे शिबिराचे आठवे वर्ष होते. सामाजिक भावनेतून दरवर्षी शिबिर राबवून गरजू दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचे प्रत्यारोपण करून दिले जाते, असे ते म्हणाले.

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्य