कैद्यांना बसविले कृत्रिम पाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 00:44 IST2019-03-16T00:44:10+5:302019-03-16T00:44:41+5:30
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात मुंबई येथील टाटा ट्रस्ट व जयराम रुग्णालय यांच्या मदतीने दोन कैद्यांना कृत्रिम पाय बसविण्यात आल्याने अपंग कैद्यांना स्वत:च्या पायावर उभे राहणे शक्य झाले आहे.

कैद्यांना बसविले कृत्रिम पाय
नाशिकरोड : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात मुंबई येथील टाटा ट्रस्ट व जयराम रुग्णालय यांच्या मदतीने दोन कैद्यांना कृत्रिम पाय बसविण्यात आल्याने अपंग कैद्यांना स्वत:च्या पायावर उभे राहणे शक्य झाले आहे.
कारागृहात कृत्रिम पाय (जयपूर फूट) बसविण्याच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कारागृहाचे अधीक्षक राजकुमार साळी, वरिष्ठ कारागृह अधिकारी अशोक कारकर, पल्लवी कदम, डॉ. आर. सी. कनोजिया, टाटा ट्रस्टचे लखन कुमावत, डॉ. मेरी पोटल, व्यवस्थापक राजू ढेरिंगे, शशिकांत दिवे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अपंग कैदी मोईस भारमल आणि कृष्णा शिराळकर यांना कृत्रिम पाय बसविण्यात आले.