मालेगावी गोळीबार करणाऱ्या एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 00:33 IST2020-02-29T00:32:44+5:302020-02-29T00:33:33+5:30
मालेगाव येथील माजी नगरसेवक प्रा. रिजवानखान अमानुल्लाखान (५०) यांच्या निवासस्थानावर गोळीबार करणाºया शेख इमरान शेख खालीद ऊर्फ इमरान बाचक्या (२७) रा. अख्तराबाद, देवीचामळा, मूळ रा. अजमेरानगर, धुळे यास स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली.

मालेगावचे माजी नगरसेवक रिजवान खान यांच्या घरावर गोळीबार करणाºया संशयित आरोपीसह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दुनगहू, चेतन संवत्सरकर, राकेश उबाळे, फिरोज पठाण, सुनील अहिरे, हेमंत गिलबिले, रतिलाल वाघ, सुहास छत्रे आदि.
मालेगाव मध्य : येथील माजी नगरसेवक प्रा. रिजवानखान अमानुल्लाखान (५०) यांच्या निवासस्थानावर गोळीबार करणाºया शेख इमरान शेख खालीद ऊर्फ इमरान बाचक्या (२७) रा. अख्तराबाद, देवीचामळा, मूळ रा. अजमेरानगर, धुळे यास स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली.
महेशनगरातील निवासस्थानी माजी नगरसेवक प्रा. रिजवान खान झोपलेले असताना दोन इसमांनी गोळीबार केल्याची घटना घडली होती. याबाबत शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पथकाने सापळा रचून नागछाप झोपडपट्टी परिसरातून सराईत गुन्हेगार शेख इमरान शेख खालीद ऊर्फ इमरान बाचक्या रा. अख्तराबाद, देवीचामळा यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून गावठी कट्टा मॅग्झिनसह मिळून आले. संशयित आरोपीने त्याच्या साथीदारासह २७ फेब्रुवारी रोजी गोळीबार केल्याची कबुली दिली.
संशयित शेख इमरान त्याच्या ताब्यातून गावठी कट्टा, मॅग्झिन व गुन्ह्यात वापरलेली बजाज पल्सर १५० मोटारसायकल जप्त केली. संशयित आरोपी शेख इमरान हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध मालेगाव व धुळे येथील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत.