शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
2
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
3
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
4
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
5
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
6
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
7
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
8
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
9
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
10
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
11
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
12
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
13
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
14
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
15
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
16
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
17
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
18
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
19
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
20
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!

पत्नीचा खून करून फरार झालेल्या पतीला अटक

By admin | Updated: July 14, 2016 01:50 IST

रेल्वे पोलिसांची कामगिरी : पोलीस कोठडीत रवानगी

नाशिकरोड : वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उंडओहोळ शिवारात मच्छिमार सुखदेव रामचंद्र मोरे (४६) याने पत्नी गुलाबबाईसोबत भांडण करून मारहाण केली. मारहाणीत गुलाबबाईचा मृत्यू झाला. तिचा मृतदेह येथील शेतात पुरून संशयित आरोपी मोरे हा फरार झाला होता. मिळालेल्या गुप्त माहितीवरून रेल्वे पोलिसांनी त्याला क्रमांक एकच्या फलाटावर ताब्यात घेतले.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मोरे हा उंडओहोळच्या वस्तीवर कुटुंबासमवेत राहत होता. मद्य पिऊन घरगुती कारणावरून मोरे याने पत्नीसोबत वाद घालत मारहाण केली होती. या मारहाणीत गुलाबबाईचा रात्री मृत्यू झाला. घटनेची माहिती कोणाला होऊ नये म्हणून, जवळच्या शेतात मोरे याने मयत गुलाबबाईचा मृतदेह पुरला आणि धूम ठोकली. मिळालेल्या गुप्त माहितीवरून मोरे हा नाशिकरोड रेल्वेस्थानकावर असल्याची बाब सहायक पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांनी नाशिकरोड रेल्वेचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन पवार यांच्याशी संपर्क साधून कळविली. त्यांना व्हॉट्स अ‍ॅपवरून फरार मोरेचे छायाचित्र पाठविले. त्यानंतर पवार यांनी प्रकाश कुलकर्णी, सुभाष कुलकर्णी, सत्यभामा चव्हाण, प्रमोद जाधव, विनीत वाघमारे यांच्या मदतीने रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक एकच्या नवीन पुलाच्या परिसरात सापळा रचला. पुलाखाली मोरे हा बसलेला असताना या रेल्वे पोलीस पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या.त्यानंतर वाडीवऱ्हे पोलिसांनी रेल्वेस्थानकावर येऊन मोरे यास अटक केली. मोरे याने गुन्ह्णाची कबुली दिली असून त्यास इगतपुरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने येत्या सोमवारपर्यंत (दि. १८) पोलीस कोठडी सुनावली आहे.