निलगीरी बाग भागात तलवार घेऊन फिरणाऱ्याला अटक
By नामदेव भोर | Updated: May 31, 2023 16:04 IST2023-05-31T16:04:11+5:302023-05-31T16:04:29+5:30
नामदेव भोर / नाशिक नाशिक : आडगाव शिवारातील निलगिरी बाग परिसरात तलवार घेऊन फिरणाऱ्या एकाला पोलिसांनी मंगळवारी (दि.३०) अटक ...

निलगीरी बाग भागात तलवार घेऊन फिरणाऱ्याला अटक
नामदेव भोर /नाशिक
नाशिक : आडगाव शिवारातील निलगिरी बाग परिसरात तलवार घेऊन फिरणाऱ्या एकाला पोलिसांनी मंगळवारी (दि.३०) अटक केली असून त्याच्याकडून धारदार तलवार हस्तगत करण्यात आली आहे. नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा दरोडा व शस्त्रविरोधी पथकाने ही कारवाई केली असून संशयित रोहीत केदार थोरात (१९, रा, निलगीरी बाग, कोळीवाडा गल्ली नं. १ औरंगाबादरोड ) याला पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहतीनुसार, पोलिस आयुक्त अंकूश शिंदे यांच्या आदेशानुसार दरोडा व शस्त्रविरोधी पथक आडगाव शिवारात गस्तीवर असताना, त्यांना निलगीरी बाग परिसरात एक तरून तलवार घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे दरोडा व शस्त्रविरोधी पथकातील सहायक पोलिस निरीक्षक किरण रौंदळ यांच्यासह पोलिस हवालदार विजयकुमार सूर्यवंशी, महेश खांडबहाले, संदीप डावरे, पोलिस नाईक मोहन देशमुख, मनिषा कांबळे यांनी संयुक्तरीत्या निलगीरी बाग भागात सापळा रचून केलेल्या कारवाईत संशयित रोहीत केदार थोरात (१९, रा, निलगीरी बाग, कोळीवाडा गल्ली नं१ औरंगाबादरोड ) हा तलवार जवळ बाळगताना पोलिसांना आढळून आला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून धारदार तलवारही जप्त करण्यात आली असून त्याच्या विरोधात आडगाव पोलिस ठाण्यात नाशिक शहर पोलिस आयुक्तांच्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.