लैंगिक क्षमता वाढविण्याच्या बहाण्याने वृद्धाला फसविणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2022 01:22 AM2022-01-08T01:22:40+5:302022-01-08T01:24:31+5:30

लैंगिक क्षमता वाढविण्याच्या बहाण्याने उपचारासाठी अर्धनग्न व नग्न अवस्थेतील फोटो पाठवून फसवणूक करणाऱ्या भोंदू वैद्यास सायबर पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. कुमारसिंग देवीसिंग चितोडीया असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Arrested for cheating old man under the pretext of increasing sexual ability | लैंगिक क्षमता वाढविण्याच्या बहाण्याने वृद्धाला फसविणाऱ्यास अटक

लैंगिक क्षमता वाढविण्याच्या बहाण्याने वृद्धाला फसविणाऱ्यास अटक

Next

नाशिक : लैंगिक क्षमता वाढविण्याच्या बहाण्याने उपचारासाठी अर्धनग्न व नग्न अवस्थेतील फोटो पाठवून फसवणूक करणाऱ्या भोंदू वैद्यास सायबर पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. कुमारसिंग देवीसिंग चितोडीया असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश गणपत आंबेकर (६७, रा.शिवाजी नगर) या वृद्धाला लैंगिक क्षमता वाढविण्यासाठी औषधे देण्याचे आमिष दाखवून अर्धनग्न व नग्न अवस्थेतील फोटो मोबाईलवर पाठवले. तसेच वृद्धाचेही फोटो काढले. त्यानंतर वेगवेगळ्या फोन क्रमांकावरून आंबेकर यांच्याशी संपर्क साधत मुले व्हावीत, यासाठी आयुर्वेदिक उपचार करीत असल्याचे भासवत त्यांच्याकडून वारंवार पैसे घेतले. तसेच मागणी न करता कुरिअरने औषधे पाठवली. या औषधांचे पैसे दिले नाही तर नग्न अवस्थेतील फोटो प्रसारित करण्याची धमकी देत सुमारे ७ लाख रुपये देण्यास भाग पाडले होते. या प्रकरणी आंबेकर यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी संशयितांचा माग काढत पुण्यातील हिंजवडी येथील किसनसिंग देवीसिंग चितोडीया याला अटक केली.

Web Title: Arrested for cheating old man under the pretext of increasing sexual ability

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.