शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
2
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
3
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
4
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
5
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
6
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
7
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
8
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
9
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
10
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
11
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
12
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
13
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
14
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
15
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
16
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
17
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
18
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
19
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
20
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

वाघाची कातडी विकणाऱ्यास अटक

By admin | Updated: September 30, 2016 02:17 IST

कातडी जप्त : २५ लाख रुपयांची लावली किंमत

नाशिक : वाघाची कातडी विकण्यासाठी एक इसम बुधवारी (दि.२८) रात्रीच्या सुमारास कॉलेजरोड भागात येणार असल्याची गुप्त माहिती सरकारवाडा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयितास कातडीसह रंगेहाथ पकडले आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, २५ लाख रुपये किमतीची वाघाची कातडी घेऊन रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास कॉलेजरोड परिसरात येणार असल्याची बातमी गुप्त बातमीदाराने दिली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, पोलीस उपनिरीक्षक योगेश उबाळे यांनी उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त राजू भुजबळ यांच्याशी चर्चा करून परिसरात त्यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला. एक १९ वर्षीय संशयित तरुण बॅग घेऊन कॉलेजरोड येथे आला. तो ग्राहकाच्या प्रतीक्षेत उभा असताना दबा धरून बसलेल्या पोलीस पथकाने त्याच्यावर झडप घालून अटक केली. पोलीस ठाण्यात आणल्यानंतर बॅगची झडती घेतली असता प्लास्टिक आवरणामध्ये बंदिस्त असलेली वाघाची कातडी आढळून आली. पोलिसांनी संशयित आरोपी ओमकार राजेंद्र अहेर (गजरा पार्क, कमोदनगर) यास अटक केली असून, त्याच्यावर वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)