वाघाची कातडी विकणाऱ्यास अटक

By Admin | Updated: September 30, 2016 02:17 IST2016-09-30T02:15:13+5:302016-09-30T02:17:32+5:30

कातडी जप्त : २५ लाख रुपयांची लावली किंमत

The arrest of those who sell the tiger wagon | वाघाची कातडी विकणाऱ्यास अटक

वाघाची कातडी विकणाऱ्यास अटक

नाशिक : वाघाची कातडी विकण्यासाठी एक इसम बुधवारी (दि.२८) रात्रीच्या सुमारास कॉलेजरोड भागात येणार असल्याची गुप्त माहिती सरकारवाडा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयितास कातडीसह रंगेहाथ पकडले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, २५ लाख रुपये किमतीची वाघाची कातडी घेऊन रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास कॉलेजरोड परिसरात येणार असल्याची बातमी गुप्त बातमीदाराने दिली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, पोलीस उपनिरीक्षक योगेश उबाळे यांनी उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त राजू भुजबळ यांच्याशी चर्चा करून परिसरात त्यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला.
एक १९ वर्षीय संशयित तरुण बॅग घेऊन कॉलेजरोड येथे आला. तो ग्राहकाच्या प्रतीक्षेत उभा असताना दबा धरून बसलेल्या पोलीस पथकाने त्याच्यावर झडप घालून अटक केली. पोलीस ठाण्यात आणल्यानंतर बॅगची झडती घेतली असता प्लास्टिक आवरणामध्ये बंदिस्त असलेली वाघाची कातडी आढळून आली. पोलिसांनी संशयित आरोपी ओमकार राजेंद्र अहेर (गजरा पार्क, कमोदनगर) यास अटक केली असून, त्याच्यावर वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The arrest of those who sell the tiger wagon