शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

लष्कर पेपरफूट : नाशकातील तीन संशयिताना अटक

By admin | Updated: February 28, 2017 02:33 IST

नाशिक : लष्करभरती परीक्षेच्या पूर्वसंध्येलाच प्रश्नपत्रिका फुटल्याने ठाणे गुन्हे शाखेने राज्यातील विविध ठिकाणांहून २१ संशयिताना अटक केली आहे़

 नाशिक : लष्करभरती परीक्षेच्या पूर्वसंध्येलाच प्रश्नपत्रिका फुटल्याने ठाणे गुन्हे शाखेने राज्यातील विविध ठिकाणांहून २१ संशयिताना अटक केली आहे़ त्यामध्ये नाशिकमधील संदीप बबन नागरे (३२,रा़ वऱ्हेदारणा, ता़निफाड, जि़ नाशिक), किरण अशोक गामणे (३२, रा. वऱ्हेदारणा, ता. निफाड, जि़ नाशिक) हे दोघे नाशिकमधील नाशिककर करिअर अकॅडमीचे संचालक, तर संदीप दौलत भुजबळ (२६, रा़ बिटको पॉइंट नाशिकरोड) हा विद्यार्थी आहे़ या सर्व संशयितांना ४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़लष्करभरतीसाठी देशभरात रविवारी (दि़२६) लेखी परीक्षा होणार होती़ मात्र परीक्षेच्या आदल्या दिवशीच प्रश्नपत्रिका फुटल्याचे ठाणे गुन्हे शाखेने उघडकीस आणले़ ठाणे पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर, अकोला, वर्धा व नाशिक येथील २१ संशयितांना अटक केली आहे़ यामध्ये माजी सैनिक, विविध करिअर अकॅडमीचे संचालक, लष्करातील जवान, अधिकारी तसेच विद्यार्थ्यांचाही समावेश आहे़लष्कर पेपरफुटी प्रकरणात नाशिकच्या नागरे, गामणे व भुजबळ या तिघांचा समावेश आढळून आल्याने अटक करण्यात आली आहे़ प्रत्येकी चार ते पाच लाख रुपयांना या प्रश्नपत्रिकेची विक्री करीत असल्याचे समोर आले आहे़ यातील संशयितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे़ दरम्यान, या संशयितांना ठाणे येथील न्यायालयात हजर केले असता ४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)