सेना-भाजपला ‘युतीधर्मा’ची ंिचंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2019 01:53 AM2019-10-08T01:53:11+5:302019-10-08T01:53:39+5:30

महायुतीकडून जिल्ह्यातील नऊ जागांवर शिवसेना आणि सहा जागांवर भाजपचे उमेदवार असतील, हे आता स्पष्ट झाले आहे. मागील निवडणुकीत एकमेकांविरुद्ध उभे ठाकलेल्या सेना-भाजपची आता युती झाली असली तरी, जिल्ह्यातील पंधरा मतदारसंघांत शिवसेनेला भाजपची आणि भाजपला शिवसेनेची मते कॅश करता येईल काय,

  Army-BJP worried about 'Alliance' | सेना-भाजपला ‘युतीधर्मा’ची ंिचंता

सेना-भाजपला ‘युतीधर्मा’ची ंिचंता

Next

नाशिक : महायुतीकडून जिल्ह्यातील नऊ जागांवर शिवसेना आणि सहा जागांवर भाजपचे उमेदवार असतील, हे आता स्पष्ट झाले आहे. मागील निवडणुकीत एकमेकांविरुद्ध उभे ठाकलेल्या सेना-भाजपची आता युती झाली असली तरी, जिल्ह्यातील पंधरा मतदारसंघांत शिवसेनेला भाजपची आणि भाजपला शिवसेनेची मते कॅश करता येईल काय, याचे आव्हान दोन्ही पक्षांपुढे असणार आहे. त्यातच दोन्ही पक्षात असलेल्या अंतर्गत कुरबुरीचाही फटका संबंधित उमेदवारांना बसण्याची शक्यता असून, त्याचा धोका पाहता दोन्ही पक्षांकडून सावध पावले उचलली जात असून, नाराजांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
२०१४मध्ये झालेल्या निवडणुकीत नांदगाव मतदारसंघात राष्टÑवादीचे पंकज भुजबळ यांना ६९ हजार २६३ मते मिळाली होती. त्यावेळी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेनेचे सुहास कांदे यांनी ५० हजार ८२७, तर भाजपचे अद्वय हिरे यांनीही ५० हजार ३५१ मते घेतली होती. आता शिवसेनेने पुन्हा कांदे यांना उमेदवारी जाहीर केल्याने भाजपच्या मतांचा आधार सेनेला मिळणार आहे. त्यामुळे सेनेच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. मालेगाव बाह्यमध्ये सेनेकडून दादा भुसे यांनी उमेदवारी करताना ८१ हजार मते घेतली होती, तर विरोधातील भाजप उमेदवार पवन ठाकरे यांनी ४४ हजार ६७२ मते घेत चांगली लढत दिली होती. याशिवाय, राष्टÑवादीकडून लढणाऱ्या सुनील गायकवाड यांनी ३३ हजार मते घेतली होती. आता गायकवाड हे भाजपत असल्याने भुसे यांच्या मताधिक्यात कितपत वाढ होते याबाबतही गणिते मांडली जात आहेत. कळवण मतदारसंघात भाजपने यशवंत गवळी यांना, तर सेनेने भरत वाघमारे यांना उमेदवारी दिली होती. त्यात गवळी यांनी २५ हजार तर वाघमारे यांनी ९ हजार मते घेतली होती. कळवण मतदारसंघ सेनेच्या वाट्याला आहे. शिवाय मतदारसंघातील भूमिकन्या भारती पवार या भाजपच्या खासदार असल्याने याठिकाणी सेनेला भाजपकडून अपेक्षा वाढल्या आहेत. चांदवड मतदारसंघात भाजपकडून डॉ. राहुल आहेर यांनी उमेदवारी करताना ५४ हजार ९४६ मते घेतली होती. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे शिरीष कोतवाल यांनी उमेदवारी करत ४३ हजार मते मिळविली होती, तर सेना उमेदवार नितीन अहेर यांना १९ हजार मते मिळविता आली होती. आता आहेर व कोतवाल यांच्या सरळ सामना होण्याची चिन्हे आहेत.
येवल्यात राष्टÑवादीचे छगन भुजबळ यांनी लाखाहून अधिक मते घेतली होती. त्यांच्याविरोधातील सेना उमेदवार संभाजी पवार यांनी ६६ हजार मते घेतली, तर भाजपचे शिवाजी मानकर यांना ९ हजार मते मिळाली होती. आता भाजपच्या साथीने संभाजी पवार हे भुजबळ व त्यांच्यामधील मतांचे अंतर कमी करतात की कापून पुढे जातात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सिन्नर मतदारसंघात शिवसेनेने राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, गेल्यावेळी भाजपकडून लढत देणारे माणिकराव कोकाटे यांनी आता राष्टÑवादीची वाट धरल्याने वाजे यांच्यापुढे भाजपची मते कॅश करण्याचे आव्हान उभे राहणार आहे.
निफाड मतदारसंघात सेनेच्या अनिल कदम यांच्याविरोधात भाजपने वैकुंठ पाटील यांना उमेदवारी दिली होती. पाटील यांनी त्यावेळी १८ हजार मते घेतली होती तर राष्टÑवादीचे दिलीप बनकर यांचा ४ हजार मतांच्या फरकाने पराभव झाला होता. आता कदम यांना भाजपचे कितपत बळ पुरवले जाईल ह्याकडे लक्ष लागून असेल. दिंडोरी मतदारसंघात सेनेने धनराज महाले यांना उमेदवारी दिली होती तर अशोक बुरुंगे यांना भाजपकडून रिंगणात उतरविण्यात आले होते. परंतु, आता सेनेने भास्कर गावित यांना रिंगणात उतरविल्याने त्यांना भाजपबरोबरच पक्षांतर्गत आव्हानांचाही सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
मध्य नाशिकमध्ये भाजपला स्वपक्षातूनच आव्हान दिले जाण्याची शक्यता वर्तविली जात होती. मागील निवडणुकीत देवयानी फरांदे यांच्या विरोधात लढलेले मनसेचे वसंत गिते यांनी ३३ हजार, तर सेनेचे अजय बोरस्ते यांनी २४ हजार मते घेतली होती. या मतांची गोळाबेरीज केल्यास फरांदे यांचा विजय निर्विवाद मानला पाहिजे; परंतु, गिते यांचे बंड थोपविण्यात पक्षश्रेष्ठींना यश आले असले तरी आतून काय राजकारण रंगते, यावर फरांदे यांचे भवितव्य अवलंबून असेल.
नाशिक मध्य-पूर्वमध्ये वाट खडतर
गेल्यावेळी नाशिक पूर्वमधून भाजपच्या बाळासाहेब सानप यांच्याविरुद्ध सेनेने चंद्रकांत लवटे यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी लवटे यांनी ३२ हजाराहून अधिक मते घेतली होती. आता या मतदारसंघात भाजपने सानप यांना डावलून मनसेतून आलेल्या राहुल ढिकले यांना उमेदवारी दिल्याने भाजप उमेदवाराच्या पाठीशी सेना कितपत उभी राहते. शिवाय, मतदारसंघातील भाजप नगरसेवकांचीही कितपत साथ मिळते, यावरही भाजपच्या विजयाचे गणित अवलंबून राहणार आहे.
मध्य नाशिकमध्ये भाजपला स्वपक्षातूनच आव्हान दिले जाण्याची शक्यता वर्तविली जात होती. मागील निवडणुकीत देवयानी फरांदे यांच्या विरोधात लढलेले मनसेचे वसंत गिते यांनी ३३ हजार तर सेनेचे अजय बोरस्ते यांनी २४ हजार मते घेतली होती. या मतांची गोळाबेरीज केल्यास फरांदे यांचा विजय निर्विवाद मानला पाहिजे; परंतु, गिते यांचे बंड थोपविण्यात पक्षश्रेष्ठींना यश आले असले तरी आतून काय राजकारण रंगते, यावर फरांदे यांचे भवितव्य अवलंबून असेल.
नाशिक पश्चिममध्ये शिवसेना आक्रमक
नाशिक पश्चिममध्येही भाजपच्या सीमा हिरे यांना स्वपक्षाबरोबरच शिवसेनेतूनही विरोध असल्याने त्यांची तारेवरची कसरत बघायला मिळण्याची शक्यता आहे. त्यात भाजपमधील इच्छुकांनी पांढरे निशाण फडकाविले असले तरी शिवसेना मात्र आक्रमक झालेली आहे. देवळालीतून शिवसेनेने पुन्हा एकदा योगेश घोलप यांना पसंती दिली आहे. घोलप यांच्याविरोधात भाजपचे रामदास सदाफुले यांनी उमेदवारी करत २१ हजार मते घेतली होती. याठिकाणीही सेनेला पक्षांतर्गत विरोधाबरोबरच भाजपलाही सांभाळताना नाकीनव येणार असल्याचे संकेत आहेत. इगतपुरी मतदारसंघात कॉँग्रेसच्या निर्मला गावित यांनी ४९ हजार मते घेतली होती, तर सेनेकडून माजी आमदार शिवराम झोले यांनी ३५ हजार मते घेतली होती. आता गावित शिवसेनेत दाखल झाल्याने त्यांना भाजपसह सेनेतील अंतर्गत विरोधाला सामोरे जावे लागणार आहे.

 

Web Title:   Army-BJP worried about 'Alliance'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.