शेतकऱ्यांप्रती आपण कृतघ्न झालो आहोत का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 00:36 IST2019-01-21T00:36:07+5:302019-01-21T00:36:24+5:30
कृषिप्रधान संस्कृती असलेल्या देशात शेतकरी आत्महत्या करीत असताना आपण एकप्रकारे असहाय्य झालो आहोत. त्यामुळे शेतकºयांप्रती आपण कृतघ्न झालो आहोत की काय अशी स्थिती निर्माण झाली असून, ही परिस्थिती आपलीच आपल्याला घृणा वाटावी, अशी असल्याचे परखड मत ज्येष्ठ विचारवंत तथा लेखक डॉ.अण्णासाहेब साळुंके यांनी व्यक्त केले.

शेतकऱ्यांप्रती आपण कृतघ्न झालो आहोत का?
नाशिक : कृषिप्रधान संस्कृती असलेल्या देशात शेतकरी आत्महत्या करीत असताना आपण एकप्रकारे असहाय्य झालो आहोत. त्यामुळे शेतकºयांप्रती आपण कृतघ्न झालो आहोत की काय अशी स्थिती निर्माण झाली असून, ही परिस्थिती आपलीच आपल्याला घृणा वाटावी, अशी असल्याचे परखड मत ज्येष्ठ विचारवंत तथा लेखक डॉ.अण्णासाहेब साळुंके यांनी व्यक्त केले.
मविप्रच्या व बळीराजा गौरव समिती नााशिक यांच्यातर्फे होरायझन अकॅडमीच्या सभागृहात रविवारी (दि.२०) डॉ. आ. ह. साळुंके यांचा अमृत महोत्सवानिमित्त बळीराजा सन्मान पुरस्काराने गौरव करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार, के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांच्यासह प्रा. उल्हास पाटील, प्रा. अर्जून कोेकाटे, प्रा. अर्जून जाधव, सकाळचे ज्येष्ठ पत्रकार श्रीमंत माने, नगरसेवक स्वाती भामरे, मविप्रचे संचालक सचिन पिंगळे आदी उपस्थित होते. डॉ. आण्णासाहेब साळुंके म्हणाले, भारतीय संस्कृती ही कृषिप्रधान संस्कृती असून येथील शेतीला ५ ते ६ हजार वर्षांचा इतिहास आहे. अशी विकसित परंपरा लाभलेल्या कृषिप्रधान देशातच आज लाखो शेतकरी आत्महत्या करीत आहेत. असे असताना आपण तटस्थ राहणे योग्य आहे का? याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली असल्याचे परखड मत डॉ. साळुंके यानी व्यक्त केले. प्रास्ताविक गोपाळ पाटील यांनी केले. सूत्रसंचालन राजेश भुसारे यांनी केले. प्रा. अर्जून कोकाटे यांनी आभार मानले. शेतकºयांसमोरी समस्या दूर करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न गरजेचे असून, हवामान बदलामुळे शेतीसमोरील आव्हाने दिवसेंदिवस वाढत असल्याने शेती आणि शेतकरी वाचविण्यासाठी सर्वस्तरातून प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी व्यक्त केले.