शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

निवेदन : राजाभाऊ वाजे यांच्यासह स्टाईसच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट

By admin | Updated: January 8, 2016 23:47 IST

औद्योगिक वसाहतप्रश्नी उद्योगमंत्र्यांना साकडे

सिन्नर : सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीच्या व उद्योजकांच्या शासन स्तरावर प्रलंबित असलेल्या महत्त्वाच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आमदार राजाभाऊ वाजे यांच्यासह स्टाईसच्या पदाधिकाऱ्यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन समस्या मार्गी लावण्यासाठी त्यांना साकडे घातले. यावेळी त्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आमदार वाजे यांच्यासह सिन्नर तालुका औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष अरुण चव्हाणके, संचालक नामकर्ण आवारे, नगरसेवक विजय जाधव यांनी उद्योगमंत्री देसाई यांची मुंबई येथील मंत्रालय दालनात भेट घेतली. सिन्नर औद्योगिक वसाहतीच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर त्यांच्यासोबत चर्चा केली. २०१३ च्या सामूहिक प्रोत्साहन योजनेंतर्गत तालुकानिहाय वर्गीकरण करताना सिन्नर तालुक्याचे वर्गीकरण ‘सी’ विभागात करण्यात आले आहे. त्यामुळे तालुक्याचा औद्योगिक विकास मंदावला असून, येथील इंडिया बुल्सचे विशेष आर्थिक क्षेत्र विकसित होणार नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे सिन्नर तालुक्याचा ‘डी प्लस’ विभागात समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे. पुनरुज्जीवनक्षम नसलेल्या तसेच बंद उद्योग घटकांच्या हस्तांतरणासाठी असलेल्या विशेष अभय योजनेला पाच वर्षांसाठी मदतवाढ मिळावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. वर्षानुवर्षे बंद असलेले उद्योग नवीन उद्योजकास हस्तांतर करण्यासाठी प्रचलित जाचक अट शिथिल करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. राज्यातील सहकारी औद्योगिक वसाहतीसाठी चटई निर्देशांक १.५० लागू करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. माळेगाव औद्योगिक वसाहतीतून सिन्नर तालुका औद्योगिक वसाहतीला प्रतिदिन एक हजार ५०० घनमीटर पाणी मंजूर आहे. तथापि, संस्थेत झालेल्या उद्योगांच्या वाढीमुळे पाण्याची मागणी वाढली असून, संस्थेला दोन हजार ५०० घनमीटर पाणी घेण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. संस्थेची जिरायत झोनमधील (गट क्रमांक १००५/अ-१) क्षेत्र ६ हेक्टर १६ आर हे क्षेत्र औद्योगिक वापरासाठी बदल करून मिळण्याचा प्रस्ताव वर्षानुवर्षापासून शासनाकडे प्रलंबित आहे. नगरविकास विभागाकडे पाठपुरावा करण्यासाठी उद्योगमंत्र्यांनी सहकार्य करावे, असे साकडे त्यांना घालण्यात आले. मराठवाडा आणि विदर्भात उद्योगांचा विजेच्या दराच्या सुसूत्रीकरणाबाबत घेतलेला निर्णय उत्तर महाराष्ट्रात लागू करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली. (वार्ताहर)