कांदा दर घसरणीमुळे चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 01:04 IST2021-03-03T18:39:49+5:302021-03-04T01:04:24+5:30
शिरवाडे : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बाजार समित्यांमध्ये कमी दराने कांदा खरेदी सुरू झाली असल्याने ह्यखर्च जादा उत्पादन कमीह्ण व बाजारभावातील घसरण यामुळे कांदा आता शेतकऱ्यांना रडवत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

मागील आठवड्यात ३५०० ते ४५०० रुपये दराने होत असलेली कांदा खरेदी आता १५०० ते २२०० दरम्यान होत असल्यामुळे बाजारभावात किमान दोन हजार रुपयांची घसरण झाल्यामुळे शेतकरी वर्गाचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.
कांद्याचे एकरी उत्पादन एकशे वीस ते दीडशे क्विंटलपर्यंत अपेक्षित असताना नैसर्गिक आपत्तीमुळे ते आता अवघे ४० ते ४५ क्विंटल पर्यंत आले आहे. अवघे पंधराशे ते दोन हजार पर्यंत बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी चालू झाली आहे. परिणामी कांदा बियाणे खरेदीपासून ते बाजार समितीपर्यंत नेण्याचा खर्च हा भरमसाट झाल्यामुळे शेतकरी वर्गाचा झालेला खर्चसुद्धा फिटत नाही. निफाड तालुक्यामध्ये पोळ कांदा लागवडीचे प्रमाण कमी आहे. रांगडा कांद्याची बहुतांश प्रमाणात लागवड होत असते. सुरवातीच्या कालावधीत मिळालेला भाव ठराविकच शेतकऱ्यांना मिळाला असून शेतकरी वर्गाला शासनाकडून किमान शेतीमालाला योग्य भाव व मुबलक वीज माफक दरात मिळणे गरजेचे आहे.
(०३ ओनियन)