चांदवडला विनाकारण फिरणाऱ्यांची ॲन्टिजन चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 18:17 IST2021-04-17T18:16:45+5:302021-04-17T18:17:23+5:30
चांदवड : शहरात सामाजिक अंतर न राखणे, विना मास्क घराबाहेर पडणे अशा प्रकारे कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

चांदवडला विनाकारण फिरणाऱ्यांची ॲन्टिजन चाचणी
ठळक मुद्दे २० व्यक्तींची चाचणी करण्यात आली.
चांदवड : शहरात सामाजिक अंतर न राखणे, विना मास्क घराबाहेर पडणे अशा प्रकारे कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
प्रशासनाने कोरोनाच्या काळात घालून दिलेल्या नियमांचे सर्रास उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर बाजारतळ मनमाड चौफुली भागात कारवाई करण्यात आली. यावेळी नियम तोडणाऱ्यांकडून दंड वसूल करण्यात आला. या कारवाईत विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना पकडून त्यांची रॅपिड ॲन्टिजन चाचणी करण्यात आली. एकूण २० व्यक्तींची चाचणी करण्यात आली.