नांदगाव येथे अतिक्रमण निर्मूलन मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 01:30 IST2020-02-16T01:28:51+5:302020-02-16T01:30:44+5:30
नांदगाव शहरात मुख्य रस्त्यावर बेकायदेशीरपणे हातगाडे लावून वाहतुकीला अडथळे ठरणाऱ्या फेरीवाल्यांवर नांदगाव पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे. रस्त्यावरील अतिक्रमण हटविल्याने शहरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतल्याचे चित्र शनिवारी (दि.१५) दिसून आले.

नांदगाव येथे अतिक्रमण निर्मूलन मोहीम
नांदगाव : शहरात मुख्य रस्त्यावर बेकायदेशीरपणे हातगाडे लावून वाहतुकीला अडथळे ठरणाऱ्या फेरीवाल्यांवर नांदगाव पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे. रस्त्यावरील अतिक्रमण हटविल्याने शहरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतल्याचे चित्र शनिवारी (दि.१५) दिसून आले.
प्रारंभी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे व पथकाने सकाळी शहरात फेरी मारून फेरीवाल्यांना सूचना करून वाहतुकीला अडथळे निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन केले होते.
नांदगाव शहर हे सध्या हातगाडे, फेरीवाले, फुटपाथवरील अतिक्रमणांच्या जोखडात अडकले असल्याचे चित्र दिसून येत
आहे. तसेच शाकंबरी पुलावरील बेकायदेशीरीत्या केलेल्या वाहनांच्या पार्किंगमुळे वाहतूक कोंडी नित्याचीच झाल्याने पालिकेच्या माध्यमातून पोलिसांनी अतिक्रमण निर्मूलन केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.