महापालिकेत आणखी एका पाहुण्या अधिकाऱ्याची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 00:40 IST2018-10-21T00:40:00+5:302018-10-21T00:40:15+5:30

महापालिकेत आता केवळ दोन स्थानिक खातेप्रमुख असून, बाकी सर्वप्रमुख शासकीय सेवेतील असताना आता आणखी एका पाहुण्या अधिकाºयाचे आगमन झाले आहे. विभागीय आयुक्तालयातील उपआयुक्त उन्मेष महाजन यांनी महापालिकेत उपआयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

Another civic officer appointed in municipal corporation | महापालिकेत आणखी एका पाहुण्या अधिकाऱ्याची नियुक्ती

महापालिकेत आणखी एका पाहुण्या अधिकाऱ्याची नियुक्ती

नाशिक : महापालिकेत आता केवळ दोन स्थानिक खातेप्रमुख असून, बाकी सर्वप्रमुख शासकीय सेवेतील असताना आता आणखी एका पाहुण्या अधिकाºयाचे आगमन झाले आहे. विभागीय आयुक्तालयातील उपआयुक्त उन्मेष महाजन यांनी महापालिकेत उपआयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
महापालिकेत सध्या परसेवेतील अधिकाºयांचे राज्य आहे. अनेक अधिकारी निवृत्त झालेत किंवा त्यांच्याकडील जबाबदारीवर आणखी एक परसेवेतील वरिष्ठ अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. सध्या समाजकल्याण विभागाचे खाते प्रमुख म्हणून हरिभाऊ फडोळ एकमेव असून, उर्वरित सर्व खात्यांचे खातेप्रमुख हे अन्य महापालिका व शासकीय सेवेतील आहेत. त्यात आता उन्मेष महाजन यांची भर पडणार आहे. महाजन यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी म्हणूनदेखील विविध विभागांत काम केले आहे. त्यांची महापालिकेत नियुक्ती झाली असली तरी ते आयुक्त तुकाराम मुंढे विदेश दौºयावरून आल्यानंतर १ नोव्हेंबर रोजी रुजू होणार आहेत.

Web Title: Another civic officer appointed in municipal corporation