पाण्याअभावी पशुपालन व्यवसाय संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 16:48 IST2018-11-14T16:46:40+5:302018-11-14T16:48:14+5:30
सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात अत्यल्प पावसामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. चारा - पाण्याअभावी शेळी, मेंढी पालन व्यवसाय संकटात सापडला आहे.

पाण्याअभावी पशुपालन व्यवसाय संकटात
रखरखत्या उन्हात रानोमाळ फिरून चारा पाण्याचा शोध घेण्यासाठी पशुपालकांना भटकंती करावी लागत आहे. चालू हंगामात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने पूर्व भागात दुष्काळाची तीव्रता जाणू लागली आहे. वाड्या वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पावसाअभावी पिके करपून गेली आहेत. त्यामुळे शेळया, मेंढयांच्या व्यवसाय संकटात सापडला आहे. पशुपालकांना जनावरांच्या चा-यासाठी वणवण करावी लागत आहेत. तसेच चाºयाअभावी कोंडी झालेल्या पशूपालकांवर पशूधन विक्री करण्याची वेळ आली आहे.