शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

आनंद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे विद्यार्थ्यांना वैद्यकीय मदत

By admin | Updated: January 25, 2016 23:20 IST

आश्रमशाळा : ६५० विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी

नाशिक : येथील आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आणि श्रीमती मदनबाई इंदरचंद दुगड चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने महाराष्ट्र समाज सेवा संघाच्या वाघेरे आश्रमशाळेतील ६५० विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी, धनुर्वातासंबंधी लसीकरण आणि औषधांच्या किटचे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव सुधाकर साळी यांनी ट्रस्टबद्दल कृतज्ञता व्यक्त करत कार्याचा गौरव केला.महाराष्ट्र समाज सेवा संघाच्या वतीने वाघेरे येथे आश्रमशाळा चालविली जाते. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना वैद्यकीय मदतीची गरज लक्षात घेता आनंद चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक डॉ. आर. आय. दुगड व डॉ. सुषमा दुगड यांनी आश्रमशाळेत जाऊन ६५० विद्यार्थ्यांना धनुर्वाताचे इंजेक्शन दिले. याशिवाय अर्पण रक्तपेढीच्या मदतीने सर्व विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी करत त्यांना कार्डचे वितरण करण्यात आले. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना आजारपणाच्या काळात लागणाऱ्या अत्यावश्यक औषधांचे किटही दुगड दाम्पत्याने पुरविले. तसेच विद्यार्थ्यांना खेळाचे विविध साहित्य देण्यात आले. आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या या दातृत्ववृत्तीला सलाम करत संस्थेचे सचिव सुधाकर साळी यांनी दुगड दाम्पत्याबद्दल गौरवोद्गार काढले. यावेळी सर्व साहित्य आश्रमशाळेचे मुख्याध्यापक संदीप चौधरी आणि संगीता मालुंजकर यांनी स्वीकारले. यावेळी डॉ. आर. आय. दुगड आणि डॉ. सुषमा दुगड यांनीही मनोगत व्यक्त करत यापुढेही वैद्यकीय मदत कायम सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, डॉ. सुषमा दुगड यांनी विद्यार्थ्यांना हास्ययोगाचे प्रात्यक्षिक दाखविले, तसेच विद्यार्थिनींना त्यांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी डॉ. नीलिमा चाफेकर, अश्विनी धोपावकर यांच्यासह आश्रमशाळेतील शिक्षक पवार, सौ. चौधरी, सौ. सोनवणे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)