मनेगाव विद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:15 AM2018-03-28T00:15:37+5:302018-03-28T00:15:37+5:30

तालुक्यातील मनेगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या नूतन जवाहर विद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहात झाला. शालेय समिती सदस्य विश्वनाथ सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मेळाव्यास सेवानिवृत्त मुख्याध्यापक आर. जे. थोरात, वडांगळी येथील न्यू इंग्लिश स्कूलचे प्राचार्य एस. व्ही. रत्नाकर व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीपूजन करण्यात आले.

Alumni gathering in Manegaon School | मनेगाव विद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा

मनेगाव विद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा

Next

सिन्नर : तालुक्यातील मनेगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या नूतन जवाहर विद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहात झाला. शालेय समिती सदस्य विश्वनाथ सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मेळाव्यास सेवानिवृत्त मुख्याध्यापक आर. जे. थोरात, वडांगळी येथील न्यू इंग्लिश स्कूलचे प्राचार्य एस. व्ही. रत्नाकर व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीपूजन करण्यात आले. मुख्याध्यापक गुलाब सय्यद यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात माजी विद्यार्थी मेळावा घेण्याचा उद्देश स्पष्ट केला. किशोर जाधव यांनी विद्यालयातील विविध उपक्र मांची माहिती दिली. यावेळी तानाजी शिंदे, राजाराम मुरकुटे, के. पी. सोनवणे, व्ही. व्ही. सोनवणे, के. बी. मापारी, एस. डी. पाटील, अण्णासाहेब सोनवणे  यांनी गतकाळातील आठवणींच्या स्मृती आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या.  यावेळी माजी विद्यार्थ्यांनी शिक्षक व शाळेविषयीच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला व आम्ही केवळ शाळेच्या संस्का रामुळेच घडलो अशा भावना व्यक्त केल्या. यावेळी प्रमुख पाहुणे थोरात यांनी विद्यालयाच्या विकासासाठी विविध मार्गाने निधी कशाप्रकारे जमा करता येईल हे सोदाहरण सांगितले. तसेच यापुढे जर विद्यालयाचा विकास करावयाचा असेल तर लोकसहभाग अतिशय आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. शाळेने दिलेली संस्काराची शिदोरी जपा व शाळेविषयी प्रेमाचे नाते कायम ठेवा, असे आवाहन शरद रत्नाकर यांनी केले. यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष आनंदा सोनवणे, त्र्यंबक सोनवणे, विश्वनाथ सोनवणे, परशराम सोनवणे, भगवान सोनवणे, सुकदेव जाधव, बाळकृष्ण पवार, डी.टी. ठाकरे आदी उपस्थित होते. तानाजी शिंदे यांनी विद्यालयास ११ हजार रु पयांचा निधी दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम ढोली यांनी केले, तर सुदाम वाजे यांनी आभार मानले. मेळावा यशस्वीतेसाठी प्रवीण पानपाटील, रोहिणी भगत, शरद सोनवणे, अनंत पानसरे यांनी सहकार्य केले.

Web Title: Alumni gathering in Manegaon School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.