शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता करारासाठी कोणीही जिवंत राहणार नाही, युरोपला युद्ध हवे असेल तर रशिया तयार'; पुतिन यांचा युरोपला थेट इशारा
2
झारखंडमध्ये राजकीय उलथापालथ? हेमंत सोरेन अन् भाजपाच्या नव्या मैत्रीची चर्चा, पडद्यामागे हालचाली
3
Mumbai Crime: पोटच्या मुलीचा ब्लेडने गळा चिरला, वाचवायला गेलेल्या पत्नीवरही हल्ला; कशामुळे घडलं?
4
फ्लॅट सुरुवातीनंतर शेअर बाजार 'धडाम'! सेन्सेक्स १६० अंकांनी आपटला; निफ्टीही २५,९५८ च्या खाली
5
कोण आहे देवव्रत रेखे? अवघ्या १९ व्या वर्षी पूर्ण केलं दंडक्रम पारायण; मोदी-योगींनीही नावाजलं
6
धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जनासाठी देओल कुटुंब हरिद्वारमध्ये; सनी-बॉबी VIP घाटावर करणार विधी
7
पलाश मुच्छल प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात, स्मृती मंधानासोबतच्या लग्नावर अजूनही मौनच
8
Ola-Uber ला टक्कर देण्यासाठी आली 'भारत टॅक्सी'; 'या' ठिकाणी ट्रायल सुरू, १० दिवसांत ५१ हजार चालकही जोडले
9
Canara Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹७९,५०० चं फिक्स व्याज; पाहा कोणती आहे ही स्कीम
10
भाजपानं सोनिया गांधींना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं; काँग्रेस उमेदवारासमोर उभं केलं आव्हान
11
धक्कादायक! ५ वर्षांत २ लाख खासगी कंपन्या बंद, केंद्र सरकारचा लोकसभेत खुलासा
12
BHU मध्ये रात्री उशिरा राडा, विद्यार्थी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये दगडफेक, नेमकं काय घडलं?
13
'एका हॉटेलचे बिल दुसऱ्या हॉटेलमध्ये देता का?', कर्तव्यनिष्ठ महिला पोलिसाच्या कामगिरीची वरिष्ठांकडून दखल
14
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
15
‘संचार साथी’वर गदारोळ! नको असेल तर डिलीट करा; सरकारचा बचावात्मक पवित्रा
16
"आगाऊ मेंटेनन्स घेणे हे बेकायदा कृत्य; वसुली थांबवण्याचे निर्देश ‘महारेरा’ने बिल्डरांना द्यावेत"
17
‘दुबार’ निकाल टळला; फैसला २१ डिसेंबरलाच; नागपूर व औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय
18
महाड, रोह्यामध्ये महायुतीचे कार्यकर्ते भिडले, रायगड जिल्ह्यात मतदानादरम्यान तुंबळ हाणामारी
19
अग्रलेख: डिजिटल टोळ्या जेरबंद होतील? सर्वोच्च न्यायालयाची सजगता स्वागतार्ह
20
आजचे राशीभविष्य, ३ डिसेंबर २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

आधीच उल्हास, त्यात फाल्गून मास !

By श्याम बागुल | Updated: September 27, 2019 19:39 IST

‘आधीच उल्हास त्यात फाल्गून मास’ अशी काहीशी परिस्थिती नाशिक जिल्हा परिषदेच्या कामकाजाची झाली आहे. गेल्या वर्षी विधानपरिषदेच्या निवडणुकांमुळे बराच कालावधी आचारसंहितेत गेला परिणामी जिल्हा परिषदेचे विविध खात्यांसाठी केलेली तरतूद वेळेत खर्ची पडू शकली नाही.

ठळक मुद्दे मार्च ते मे महिन्यापर्यंत लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हातावर हात धरून पदाधिका-यांच्या हेतू विषयी शंका घेण्याइतपत परिस्थिती

श्याम बागुलजिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना शासनाने चार महिन्यांची मुदतवाढ दिल्याने उर्वरित काळात विकासाची कामे करण्यास प्राधान्य दिले जाईल अशी ग्वाही देतांनाच त्याच बरोबर गेल्या अडीच वर्षात काहीच कामे होवू शकली नाही अशी अप्रत्यक्ष कबुलीच दिली. त्यामुळे येत्या चार महिन्यात जिल्हा परिषदेच्या विकासाची ट्रेन सुपरफास्ट धावेल अशी अपेक्षा बाळगली जात असताना त्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्याने वेग घेण्याच्या तयारीत असलेल्या सुपरफास्ट ट्रेनचे पॅसेंजरमध्ये रूपांतर झाले आहे. विधानसभा निवडणुकीच्या विजयाचा गुलाल धूवून निघत नाही तो पदाधिकारी व सदस्यांचे जिल्हा परिषदेला पाय लागणार नाहीत, अशा परिस्थितीत विकास कामांचे काय होणार असा निरर्थक प्रश्न विचारण्यात काही हाशिलही नाही.

‘आधीच उल्हास त्यात फाल्गून मास’ अशी काहीशी परिस्थिती नाशिक जिल्हा परिषदेच्या कामकाजाची झाली आहे. गेल्या वर्षी विधानपरिषदेच्या निवडणुकांमुळे बराच कालावधी आचारसंहितेत गेला परिणामी जिल्हा परिषदेचे विविध खात्यांसाठी केलेली तरतूद वेळेत खर्ची पडू शकली नाही. त्यामुळे शासनाकडे सुमारे ९५ कोटी रूपयांचा निधी परत पाठविण्याची नामुष्की पदाधिकाऱ्यांबरोबरच अधिका-यांवरही ओढवली. यंदा मात्र तसे काही होवू नये व अडीच वर्षे कारकिर्दीतील शेवटचे वर्ष जलदगती व पारदर्शी निर्णयाने गाजावे असा विचार केलेल्या पदाधिका-यांना मार्च ते मे महिन्यापर्यंत लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हातावर हात धरून बसावे लागले. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या सावटाखाली जून महिन्यात कामकाजाला सुरूवात करताना हाती असलेल्या दिवसात काय करू नी काय नको अशी अवस्था पदाधिका-यांची झालेली असली तरी, प्रशासनातील अधिका-यांना मात्र त्यांचे गांभीर्य कितपत होते हा प्रश्नच होता. तसे नसते तर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण व स्थायी समितीच्या सभा अधिका-यांच्या नाकर्तेपणामुळे तहकूब कराव्या लागल्या नसत्या. एवढे करूनही जलदगतीने निर्णय घेवून त्याची पारदर्शी अंमलबजावणी झाली असा छातीठोक दावा कोणीही करू शकणार नाही. कारण विधानसभेची आचारसंहिता जारी होण्याच्या आठवडाभर अगोदर जिल्हा परिषदेच्या प्रत्येक खाते प्रमुखांची सुरू असलेली धावपळ व त्यांना ठेकेदारांना घातलेला गराडा पाहता नेमके काय चालले होते याची कल्पना यावी. एवढे करूनही आचारसंहितेच्या कचाट्यात अनेक कामे अडकल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेक कामे मंजुर होवूनही त्यांना कार्यारंभ आदेश देण्यात आलेले नाहीत, तर वैयक्तीक लाभाच्या योजनांना नियम, निकषाचा खोडा बसला आहे. रस्ते, शाळा दुरूस्ती असो की आरोग्य केंद्रांची उभारणी आचारसंहितेच्या कचाट्यात अडकली. विकास कामांना आचारसंहितेचा फटका बसलाच बसला त्याच बरोबर जिल्हा परिषद प्रशासनाच्या अखत्यारितील बाबीही लांबणीवर पडल्या आहेत. या साºया गोष्टींना अधिकारीच जबाबदार आहेत असे नव्हे तर पदाधिकारी व सदस्यांकडूनही त्यात अनेक मार्गाने खोडा घालण्यात आला आहे. प्रत्येक प्रशासकीय कामासाठी सदस्यांना विश्वासात घेण्याची केल्या जाणा-या मागणीतून सदस्य, पदाधिका-यांच्या हेतू विषयी शंका घेण्याइतपत परिस्थिती निर्माण झाली आहे. असाच कारभार यापुढे चालणार असेल तर शासनाने जिल्हा परिषद पदाधिकाºयांना आणखी पाच वर्षाचा कार्यकाळ वाढवून दिला तरी तो अपुराच पडणार आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद