शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

गोणीपद्धती विरुद्ध सर्वपक्षीय ‘एल्गार’

By admin | Updated: July 30, 2016 23:59 IST

कांदा उत्पादकांची बैठक : व्यापाऱ्यांच्या धोरणावर टीका

 लासलगाव : शासनाच्या नियमनमुक्ती विरोधात कांदा व्यापाऱ्यांनी घेतलेल्या आडमुठे धोरणाच्या विरुद्ध आज लासलगावी खरेदी-विक्री संघात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत कार्यकर्त्यांनी कांदा गोणी मार्केटच्या विरोधात एल्गार पुकारला. सोमवार, दि. १ आॅगस्ट रोजी निफाड तहसीलदार व प्रांताधिकारी यांना या संदर्भात निवेदन देण्यात येणार असून, बुधवारपासून लासलगाव व निफाड मार्केट यार्डात गोणी लिलाव होऊ देणार नाही, अशी भूमिका सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी या बैठकीत जाहीर केली. या बैठकीला भाजपाचे ज्येष्ठ नेते सुरेश पाटील, नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील, राजाभाऊ शेलार, शेतकरी संघटनेचे बाबासाहेब गुजर, शिवसेना नेते राजाभाऊ दरेकर, शिवा सुरासे, लासलगाव ग्रा. पं. सदस्य डी.के. जगताप, बाजार समितीचे संचालक बबनराव सानप, वैकुंठ पाटील, मोतीराम मोगल, लोकनेते दत्ताजी पाटील बँकेचे संचालक तुळशीराम जाधव, लक्षमण मापारी, खरेदी विक्र ी संघाचे उपाध्यक्ष नितीन घोटेकर, एल.के. बडवर , राजेंद्र दरेकर, राजाराम मेमाणे, भाजपाचे सुरेश दाते, विलास थोरे यांच्यासह निफाड तालुक्यातील विविध पक्षांचे पदाधिकारी हजर होते. शासनाच्या नियमनमुक्तीविरोधात शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरवून त्यांच्या तोंडून नको ते वदवून घेतले जात आहे. शासनावर दबाव टाकण्याचा व्यापाऱ्यांचा कुटिल डाव असून तो उधळून लावण्यासाठी सर्वानी कंबर कसावी, असे आवाहन ज्येष्ठ भाजापा नेते सुरेश पाटील यांनी यावेळी केले. नानासाहेब पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात म्हटले की, संपूर्ण महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांनी संप मागे घेतला. त्या काळात नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी आमच्याकडे मोकळ्या लुज मालाचा लिलाव होत असल्यामुळे आम्हाला काही वेळ अधिक द्या, असे म्हणत संप सुरूच ठेवला व नंतर आम्ही निर्णय घेऊ, अशी भूमिका घेतली. मात्र नंतर कांदा गोणीत भरून आणला तरच लिलाव होईल, अशी आडमुठी भूमिका घेतल्याने आठ दिवसांपासून कांदा उत्पादक गोणीच्या गळफासाने घायाळ झाला आहे. गोणी लिलाव झाल्यावर शेतकऱ्यासमोर रिकामी करताना वांधे काढले जातात. गोणी मार्केटच्या विरोधामध्ये आपल्या संतप्त भावना व्यक्त करताना अनेकांनी बाजार समितीच्या भूमिकेचा निषेध केला. शेतकरी बांधवांनी सोमवारी दुपारी २ वाजता निफाड तहसीलदार कार्यालयात निवेदन देण्यासाठी मोठ्या संख्येने हजर राहावे, असे आवाहन भाजपा नेते सुरेश बाबा पाटील व नाफेचे संचालक नानासाहेब पाटील यांनी यावेळी केले. यावेळी अनिल सोनवणे, निवृत्ती गायकर, शांताराम सोनवणे,किशोर क्षीरसागर, भाजपाचे कैलास सोनवणे, कैलास तासकर, बळीराम जाधव, शिवाजी द्वबर, प्रभाकर बडवर, सुरेश बडवर, विजू आहिरे आदि उपस्थित होते.(वार्ताहर)