All four in the city embraced a life-long journey | शहरात चौघांनी गळफास घेत संपविली जीवनयात्रा

शहरात चौघांनी गळफास घेत संपविली जीवनयात्रा

ठळक मुद्देपोलीस पुढील तपास करत आहेत.

नाशिक : शहरात बुधवारी (दि.१६) वेगवेगळ्या घटनांमध्ये एका महिलेसह चौघांनी गळफास घेत आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोघा इसमांनी राहत्या घरात गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. शरद ईश्वर महाजन (३०, रा. माउली चौक, दत्तनगर) आणि प्रशांत गजानन काळे (रा. कामटवाडे) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. शरद महाजन यांनी बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास तर प्रशांत काळे यांनी सायंकाळी चारच्या सुमारास गळफास घेतल्याचे आढळून आले. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसेच चेतनानगर परिसरात राहणाऱ्या कंचन मनोज झा (३७) या महिलेने दुपारी राहत्या घरात गळफास घेतल्याचे आढळून आले. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. म्हसरूळ बोरगड येथील आदर्शनगर परिसरात अमित रमेश पवार (३६) यांनी राहत्या घरात सकाळच्या सुमारास गळफास घेतल्याची घटना घडली. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. चौघांच्या आत्महत्येमागील कारण समजू शकले नसून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

Web Title: All four in the city embraced a life-long journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.