गावठी दारू भट्टींवर अभोणा पोलीसांचा छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 19:08 IST2020-04-10T19:07:28+5:302020-04-10T19:08:23+5:30
अभोणा : कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी सर्वत्र लॉकडाउन असतांना परिसरात अवैध गावठी दारू सर्रासपणे विक्र ी केली जात होती, सदर अड्डा पोलिसांनी उद्ध्वस्त केला.

गावठी दारू भट्टींवर अभोणा पोलीसांचा छापा
अभोणा : कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी सर्वत्र लॉकडाउन असतांना परिसरात अवैध गावठी दारू सर्रासपणे विक्र ी केली जात होती, सदर अड्डा पोलिसांनी उद्ध्वस्त केला.
सदर ठिकाणी दारु पिण्यासाठी तळीरामांचा वावर मोठया प्रमाणात वाढला होता. अभोण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड यांनी सहकाऱ्यांसह कनाशी, जयदर, भगुर्डी, गोसराणे आदि गावातील अवैध गावठी दारूच्या हातभट्यांवर छापा टाकत त्या उद्ध्वस्त केल्या या कारवाईत सुमारे पन्नास हजार रु पयांचे मानवी आरोग्यास घातक ठरणारे रसायन नष्ट करण्यात आले. या मोहीमेत उपनिरीक्षक नरेंद्र बागुल, पोलिस हवालदार किसन काळे, बबन पाटोळे, शिंदे, ज्ञानेश्वर आहेर, गांगोंडे,चौधरी यांनी पुढाकार घेतला. संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.