शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

अखिल की आखिल होईना बोध !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 11:02 PM

नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरवणे हे शिवधनुष्य पेलण्याइतकेच कर्मकठीण कार्य असते. मूळात हा विषय अभिजात साहित्याशी निगडित असल्याने त्यासंबंधीचे प्रत्येक कार्य हे तितक्याच गांभिर्याने होणे अपेक्षित असते. मात्र, शनिवारी जेव्हा संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले, त्यावेळी त्या बोधचिन्हावर दोन ठिकाणी असलेला उल्लेख खालील बाजूस अखिल तर वरील बाजूस आखिल असा करण्यात आल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देसाहित्य संमेलन : बोधचिन्हात दोन ठिकाणी भिन्न उल्लेखाने चर्चेला बहर

धनंजय रिसोडकरनाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरवणे हे शिवधनुष्य पेलण्याइतकेच कर्मकठीण कार्य असते. मूळात हा विषय अभिजात साहित्याशी निगडित असल्याने त्यासंबंधीचे प्रत्येक कार्य हे तितक्याच गांभिर्याने होणे अपेक्षित असते. मात्र, शनिवारी जेव्हा संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले, त्यावेळी त्या बोधचिन्हावर दोन ठिकाणी असलेला उल्लेख खालील बाजूस अखिल तर वरील बाजूस आखिल असा करण्यात आल्याचे दिसून आले.

जे बोधचिन्ह संपूर्ण राज्यात, देशात आणि समाजमाध्यमांतून संपूर्ण विश्वात पोहोचणार आहे, त्या संमेलनातील बोधचिन्हच जर शुद्धलेखनाचे तारतम्य ना? बाळगता होत असेल, तर त्या संमेलनातील पुढील व्यापात मराठी भाषेचाच तर बोजवारा उडणार नाही ना? अशी आशंका साहित्यप्रेमींच्या मनी आल्यास आणि त्यातून नक्की काय बोध घ्यायचा, असा प्रश्न रसिकांच्या मनात आल्यास नवल नाही.नाशिकमध्ये २६ ते २८ मार्चदरम्यान होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाची गत आठवडाभरापासूनच सर्व रसिक वाट बघत होते. या संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण शनिवारी करण्यात आले. संमेलनाचे बोधचिन्ह हा त्या संमेलनाचा चेहरा मानला जातो. त्यामुळे त्या बोधचिन्हाच्या निर्मितीसाठी स्पर्धा घेऊन राज्यभरातील कलाकारांना आवाहन करण्यात आले, त्यानुसार ते तयार होणे आणि सर्व कलाकारांच्या प्रवेशिका पोहोचल्यानंतर त्यांचे योग्य ते परीक्षण होण्यासाठी काही कालावधी हा निश्चितपणे लागणार होता. त्यामुळे संमेलनाध्यक्ष, स्वागताध्यक्षांच्या निवडीपर्यंतदेखील बोधचिन्हाचे अनावरण झाले नसले तरी गुणवत्तापूर्ण कार्यासाठी हा विलंब साहजिकच आहे, असेच मानले गेले. मात्र, या बोधचिन्हाचे अनावरण करून ते सर्व प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचवण्यापूर्वी या बोधचिन्हाच्या निवड समितीने तसेच आयोजक संस्थेच्या धुरीणांनी त्या चिन्हाचे बारकाईने निरीक्षण करणे अपेक्षित होते.इन्फोमूळ बोधचिन्हाला नंतर जोडसाहित्य संमेलनाच्या मूळ बोधचिन्हात खालील बाजूस एकदाच ह्यअखिलह्णचा उल्लेख असून तो योग्यदेखील होता. मात्र, त्यानंतर त्यात आयोजक संस्थेचे नाव बोधचिन्हाच्या वरील भागात जोडण्यात आले आहे. ते करताना त्या ठिकाणी लिहिलेला ह्यआखिलह्य हा शब्द साहित्यप्रेमींना नक्कीच खटकणारा आहे.इन्फोह्यमहाह्णदेखील गायबया बोधचिन्हाला नंतर वरील भागात जोड देताना अखिल भारतीय मराठी साहित्य ह्यमहाह्णमंडळ असा उल्लेख अपेक्षित असताना प्रत्यक्षात नव्याने करण्यात आलेल्या बोधचिन्हात अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळ असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यातील ह्यमहाह्ण शब्दच गायब झाल्याचे चाणाक्ष वाचकाच्या नजरेतून सुटत नाही. मूळ बोधचिन्हाला जोड देताना त्यात अशी घिसाडघाई करून संमेलनाच्या बोधचिन्हातच चुका करणे अक्षम्य ठरते.फोटो३०बोधचिन्ह३०बोधचिन्ह २

टॅग्स :akhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळNashikनाशिक