नाशिकमध्ये अजित पवार यांची २ मद्य प्रकल्पांना भेट; खासगी दौरा असल्याची चर्चा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2023 11:52 IST2023-05-11T11:52:15+5:302023-05-11T11:52:28+5:30

अत्यंत गोपनीयता पाळत अजित पवार यांचा दौरा आयोजित करण्यात आला होता.

Ajit Pawar visits 2 liquor plants in Nashik | नाशिकमध्ये अजित पवार यांची २ मद्य प्रकल्पांना भेट; खासगी दौरा असल्याची चर्चा 

नाशिकमध्ये अजित पवार यांची २ मद्य प्रकल्पांना भेट; खासगी दौरा असल्याची चर्चा 

भगवान गायकवाड

दिंडोरी (नाशिक): आज राज्यातील सत्ता संघर्षाचा फैसला होत असताना माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते अजित पवार हे पूर्वनियोजित दिंडोरी तालुक्यात खाजगी दौऱ्यावर असून त्यांनी दोन मद्य प्रकल्पाला भेट दिली आहे. अत्यंत गोपनीयता पाळत अजित पवार यांचा दौरा आयोजित करण्यात आला होता.

सकाळी आठ वाजता नाशिक विमानतळ वर अजित पवार यांचे आगमन होत त्यांनी दिंडोरी तालुक्यातील कादवा म्हाळुंगी येथील परनोल्ड रिकार्ड या मद्य बनवणाऱ्या कंपनीला भेट देत तेथील डीस्टीलरीची पाहणी केली तर दहा च्या सुमारास डीयाजिओ ( मॅकडोवेल) या कंपनीत भेट देत प्रकल्पाची पाहणी केली. या दौऱ्यात कुणीही राजकीय व्यक्तीचा सहभाग नसून कंपन्यांतील कामगारांनाही या भेटीची माहिती नव्हती.

Web Title: Ajit Pawar visits 2 liquor plants in Nashik