नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमाळ्याची तयारी सुरू आहे. साधुग्रामसाठी तपोवनातील तब्बल १७०० झाडे तोडणे, पुर्नरोपण करणे वा फांद्यांची छाटणी करावी लागणार असल्याची नोटीस महापालिकेने दिली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर वृक्षतोडीच्या निर्णयामुळे पर्यावरणप्रेमी आणि अनेक कलाकारांनी तीव्र संताप व्यक्त केला. अभिनेते सयाजी शिंदे यांनीही वृक्षतोडीला विरोध केला. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सयाजी शिंदे यांच्या भूमिकेला समर्थन दिले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर एक पोस्ट केली. "तपोवनातील वृक्षतोडीच्या संदर्भात समोपचारानं तोडगा काढला पाहिजे. यासंदर्भात अभिनेते सयाजी शिंदे यांनी घेतलेली भूमिका पर्यावरण हिताची आहे. विकासाबरोबर पर्यावरणाचा समतोल राखणं ही देखील काळाची गरज आहे, पर्यावरण वाचलं तरच पुढची पिढी सुरक्षित राहीलं, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे, अशी भूमिका अजित पवार यांनी एक्सवर मांडली आहे.
सयाजी शिंदे यांनी तपोवनला भेट देऊन विरोध केला होता
अभिनेते सयाजी शिंदे यांनी काही दिवसापूर्वी नाशिकमधील तपोवन येथे भेट दिली होती. यावेळी त्यांनी महापालिकेला खडे बोल सुनावले होते. "नाशिकच्या तपोवनमधील झाडे तोडणे ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. मला अनेक फोन येत आहेत. एक झाड तोडून दहा झाडे लावू असे विधान गिरीश महाजन यांनी केलं. मंत्रीपदावर असलेल्या व्यक्तीने असे बोलणे योग्य नाही किंवा त्यांचे विधान बेजबाबदार आहे. असं बोलून ते काय चेष्टा करत आहेत का. तपोवनामध्ये जुनी झाडे आहेत. ते म्हणत आहेत की एक झाड तोडून दहा झाडे लावू. आम्ही म्हणतोय की एक झाड वाचवण्यासाठी १०० माणसं मरायला तयार आहोत, पण ते झाड तोडू देणार नसल्याचे सयाजी शिंदे म्हणाले होते.
Web Summary : Deputy Chief Minister Ajit Pawar supports protests against cutting 1700 trees in Nashik's Tapovan for Kumbh Mela preparations. He emphasizes balancing development with environmental protection, echoing actor Sayaji Shinde's concerns for future generations.
Web Summary : उपमुख्यमंत्री अजित पवार ने नासिक के तपोवन में कुंभ मेले की तैयारियों के लिए 1700 पेड़ों की कटाई के खिलाफ विरोध का समर्थन किया। उन्होंने विकास को पर्यावरण संरक्षण के साथ संतुलित करने पर जोर दिया, अभिनेता सयाजी शिंदे की भविष्य की पीढ़ी के लिए चिंताओं को दोहराया।