कृषीपंप, घरगुती वीज दरवाढीला तीव्र विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 00:31 IST2018-08-12T22:53:09+5:302018-08-13T00:31:58+5:30
शेतकऱ्यांचे कृषीपंप आणि घरगुती वीज दरवाढीला तीव्र विरोध असून, वीज दरवाढ रद्द न केल्यास शेतकरी व नागरिक लोकशाहीमार्गाने आंदोलन करतील तसेच त्याचे तीव्र पडसाद उपटतील, अशी माहिती पत्रकाद्वारे माजी महापौर दशरथ पाटील यांनी दिली.

कृषीपंप, घरगुती वीज दरवाढीला तीव्र विरोध
नाशिक : शेतकऱ्यांचे कृषीपंप आणि घरगुती वीज दरवाढीला तीव्र विरोध असून, वीज दरवाढ रद्द न केल्यास शेतकरी व नागरिक लोकशाहीमार्गाने आंदोलन करतील तसेच त्याचे तीव्र पडसाद उपटतील, अशी माहिती पत्रकाद्वारे माजी महापौर दशरथ पाटील यांनी दिली.
यासंबंधीच्या प्रसिद्धीपत्रकात पाटील यांनी म्हटले की, शेतकºयांची परिस्थिती बिकट असून, गेल्या सात वर्षांपासून मनमानी पद्धतीने वीज दरवाढ करण्यात येत आहे. त्यामुळे सेवा कमी आणि कर जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकºयांची वीज बिले पूर्णपणे माफ करावी, अशी मागणी गेल्या आठ वर्षांपासून शेतकºयांनी लावून धरलेली असताना त्याच्या विरोधी भूमिका वीज मंडळाने घेतलेली आहे.
यापूर्वी २००४ मध्ये सरकारने शेतकºयांचे वीज बिल माफ केले होते. त्याप्रमाणे आताही वीज बिल माफ करावे, तसेच कोणतीही वीज दरवाढ करू नये, अशी मागणीही पाटील यांनी केली आहे.