शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
6
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
7
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
8
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
9
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
10
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
11
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
12
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
13
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
14
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
15
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
16
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
17
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
18
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
19
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
20
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...

सात फेरे झाले, पण 'बिदाई' नाही; लग्न लागताच नववधू माहेरी अन् नवरोबा 'क्वारंटाईन'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 3:44 PM

नवरदेवाच्या मोठ्या भावाच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींची आरोग्य पथकाकडून तपासणी होणार असल्याने नवरदेवालाही आता क्वारंटाईन व्हावे लागणार आहे.

ठळक मुद्देशासकीय यंत्रणा मात्र सतर्क झाली आहे.संपर्कात आलेल्या लोकांची यादी बनविली जात आहे

नाशिक : हळदीचा कार्यक्रम आटोपता घेतला जातो अन् त्याचदरम्यान नवरदेवाच्या भावाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची वार्ता समजते. वऱ्हाडी मंडळी हळूहळू काढता पाय घेतात. बोटावर मोजण्याइतक्याच लोकांमध्ये नववधू-नवरदेव सात फेरे घेत विवाह बंधनात अडकतात; मात्र खबरदारीचा उपाय म्हणून नववधूची ‘बिदाई’ सासरी होत नाही अन् नवरदेवालाही पर्यायाने क्वारंटाईन व्हावे लागते, ही घटना घडली आहे, नाशिकजवळील पळसे गावात.निफाड तालुक्यातील शिलापूर गावाच्या एका युवकाचा विवाह नाशिकरोडजवळील पळसे येथील मुलीसोबत जमला. गुरूवारी (दि.२८) हा विवाह बोटावर मोजण्याइतक्याच लोकांमध्ये उरकून घेण्यात आला, कारण विवाहच्या पुर्वसंध्येलाच हळदीच्या कार्यक्रमादरम्यान नवरदेवाचा भाऊ कोरोनाबाधित असल्याचे अहवालानंतर समोर आले. यामुळे लग्नसोहळ्याला आलेल्या वऱ्हाडींच्या पायाखालची वाळू सरकली. हळद समारंभातून सगळ्यांनीच लागलीच काढता पाय घेणे पसंत केले. दुसऱ्या दिवशी पळसे गावात नववधू-नवरदेवच्या घराच्या मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत ‘डिस्टन्स’ राखत विवाहचा विधी आटोपता घेतला. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सप्तपदी झाल्यावर वधूला नवरदेवासोबत न पाठविण्याचा निर्णय दोन्ही कुटुंबियांकडून घेतला गेला. आपल्या नववधूला सोबत न घेता रिकाम्या वाहनाने नवरदेव कुटुंबियांसह आपल्या घरी परतला. नवरदेवाच्या मोठ्या भावाच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींची आरोग्य पथकाकडून तपासणी होणार असल्याने नवरदेवालाही आता क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. या विवाहसोहळ्याची पंचक्रोशीत मात्र चर्चा रंगली होती.विवाह जरी पार पडला असला तरी शासकीय यंत्रणा मात्र सतर्क झाली आहे. वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी पथक, पोलीस, महसूल अधिकारीवर्गाकडून प्रशासकीय पातळीवर माहिती घेतली जात आहे. पळसे गावाचे पोलीस पाटील सुनिल गायधनी यांनी सांगितले की, नवरदेवाच्या मोठ्या भावाच्या संपर्कात संपर्कात आलेल्या सर्वच लोकांची यादी बनविली जात आहे. प्रशासकीय पातळीवर काम सुरु आहे. सैय्यद प्रिंप्री येथील वैद्यकीय अधिकारी माधव आहिरे यांनी गुरूवारी सकाळी शिलापूर येथील करोना पॉझटिव्ह रु ग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्वच लोकांची माहिती घेतल्याचे सांगितले.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसmarriageलग्न