शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

कुचराई केल्यास राजीनामे हातात : पालकमंत्र्यांचा इशारा

By admin | Updated: March 14, 2017 17:25 IST

नाशिककरांनी मोठ्या विश्वासाने भाजपाला एकहाती सत्ता सोपविली आहे.

नाशिक : नाशिककरांनी मोठ्या विश्वासाने भाजपाला एकहाती सत्ता सोपविली आहे. त्यामुळे महापौर- उपमहापौरांसह पक्षाच्या सर्वच नगरसेवकांकडून पारदर्शी व भ्रष्टाचारमुक्त कारभारावर भर दिला जाईल. महापालिकेच्या कामकाजात आपण स्वत: जातीने लक्ष पुरविणार असून, पारदर्शकतेचा अभाव आणि कामकाजात कुचराई झाल्याचे आढळल्यास आपल्या हाती महापौर- उपमहापौरांचे राजीनामे तयार असल्याचा इशारा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. महापौर- उपमहापौरपदाची निवडणूक बिनविरोध पार पडल्यानंतर नवनिर्वाचित महापौर रंजना भानसी आणि उपमहापौर प्रथमेश गिते यांचा सत्कार पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना महाजन यांनी सांगितले, आजचा दिवस भाजपासाठी ऐतिहासिक आहे. नाशिककरांनी स्पष्ट बहुमत देत भाजपावर विश्वास दाखविला आहे. त्यामुळे त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही. विरोधी पक्षांनीही एकमताने भाजपा उमेदवारांची निवड केली आहे. मुख्यमंत्र्यांनी पारदर्शी कारभाराची हमी दिलेली आहे आणि त्यांनी नाशिक शहर दत्तकही घेतले आहे.

त्यामुळे महापालिकेत पारदर्शी कारभारावर सर्वांचाच भर असणार आहे. स्वत: मी कामकाजात जातीने लक्ष घालणार आहे. सर्व नगरसेवकांनाही पारदर्शी कारभारासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. भाजपाने महापौरपदी रंजना भानसी यांच्यासारख्या अनुभवी सदस्याची निवड केली आहे. त्यांचा अनुभव मोठा आहे. त्यांच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा आहे. कामकाजात कुठे कुचराई आढळल्यास महापौर- उपमहापौरांनी तारीख न टाकलेले राजीनामे देऊन ठेवलेले आहेतच, असेही महाजन यांनी स्पष्ट केले. भाजपाच्या सत्ताकाळात वचननाम्याची पूर्ण अंमलबजावणी करण्यात येईल. वचननामा बनविताना नाशिककरांकडून मागविण्यात आलेल्या आॅनलाइन सूचनांचा विचार करण्यात आला आहे. आगामी काळात विमानतळ, किकवी धरण, औद्योगिक वसाहतीच्या समस्या, स्वच्छता आदि मुद्द्यांना प्राधान्य देण्यात येईल. स्मार्ट सिटीसाठी मोठा निधी केंद्र व राज्य सरकारकडून येणार आहे. निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. गोदावरी नदी प्रदूषणासंदर्भात आवश्यक त्या उपाययोजना केल्या जाणार असल्याचे महाजन यांनी सांगितले.