नाशिक/सातपूर : सातपूर परिसरात अश्लील व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत १२ लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या टोळीचा सातपूर पोलिसांनी अवघ्या पाच तासांत पर्दाफाश करत चार संशयित आरोपींना अटक केली आहे.
ज्येष्ठ नागरिक असलेल्या फिर्यादीच्या तक्रारीनुसार, संशयित आरोपींनी फिर्यादीचा एक टॅब चोरी करून त्यामधील मैत्रीणीसोबतचे वैयक्तिक आणि संवेदनशील अश्लील व्हिडिओ व फोटो मिळवले. त्यानंतर हे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी देत १२ लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यातील दहा हजार रुपये नुकतेच देण्यात आले होते. तर गुरुवारी (दि.२) सायंकाळी ५० हजार रुपये देण्याचे ठरले होते. मात्र संशयित टोळी पैसे स्वीकारतानाच पोलिसांच्या हाती लागली.
आरोपींनी दबाव टाकण्यासाठी फिर्यादीकडून १० हजार रुपये उकळले आणि त्यांचे काही व्हिडिओ व फोटो व्हॉट्सअॅपवर पाठवून धमकी अधिक तीव्र केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण अहिरे यांनी तात्काळ पोलिस आयुक्त, पोलिस उपआयुक्त व सहाय्यक आयुक्तांना माहिती दिली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलिस ठाणे आणि गुन्हेशाखा युनिट-२ अशी दोन स्वतंत्र तपास पथके तयार करण्यात आली.
तपासादरम्यान आरोपी आडगाव शिवारातील 'दहावा मैल' परिसरात लपल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने सापळा रचला. पोलिसांना पाहताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी चारी बाजूंनी घेराव घालत सिनेस्टाईल पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. ही कारवाई पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उपआयुक्त किशोर काळे व सहाय्यक आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब दहीफळे करत असून, या प्रकरणात आणखी आरोपी किंवा इतर गुन्ह्यांचा तपास सुरू आहे.
यांना ठोकल्या बेड्या
या घटनेप्रकरणी आकाश पुंडलिक बकरे (२८) रा. सातपूर, प्रकाश रामदास पानपाटील (२५) रा. सातपूर, सुरज सुनिल गवई (२७) रा. मोतीवाला कॉलेज सातपूर आणि श्रीपत भिमराव शिंदे (३८) रा. खंबाळे ता. त्र्यबंकेश्वर यांना बेड्या ठोकण्यात आल्या.
Web Summary : Nashik police arrested four suspects for extorting ₹12 lakhs from a senior citizen. They threatened to release his private videos, stolen from a tablet, on social media. Police caught the suspects while they were collecting money.
Web Summary : नासिक पुलिस ने एक वरिष्ठ नागरिक से ₹12 लाख की उगाही करने के आरोप में चार संदिग्धों को गिरफ्तार किया। उन्होंने टैबलेट से चुराए गए निजी वीडियो को सोशल मीडिया पर जारी करने की धमकी दी। पुलिस ने आरोपियों को पैसे लेते हुए पकड़ा।