शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींमध्ये धनगर समाज नको

By admin | Updated: August 14, 2016 22:59 IST

हरिश्चंद्र चव्हाण : लोकसभेत निवेदन

 नाशिक : धनगर समाजाला आदिवासी जातीमध्ये समाविष्ट करून अनुसूचित जमातींतून आरक्षण देऊ नये. तसेच ९ आॅगस्ट हा दिवस विश्व आदिवासी दिन म्हणून साजरा केला जावा, अशी मागणी दिंडोरीचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी लोकसभेत शून्य प्रहरात झालेल्या चर्चेदरम्यान केली.आदिवासींच्या मानवी हक्कांचे संरक्षण व्हावे, त्यांना उदरनिर्वाहासाठी जल, जंगल आणि जमीन कायमस्वरूपी मिळावी. त्यांच्या संस्कृतीचे संरक्षण, अस्मिता, आत्मसन्मान मिळावा, यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेने २३ डिसेंबर १९९४ रोजी आमसभेत ठराव संमत केला. त्यानंतर ९ आॅगस्ट हा दिवस ‘आदिवासी दिन’ म्हणून साजरा केला जात असला तरी, केंद्र सरकारने यापुढे हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून पाळला जावा. महाराष्ट्रात धनगर जातीचा अनुसूचित जमातींमध्ये समावेश करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण आदिवासींची व धनगरांची संस्कृती, अस्तित्व यामध्ये फार मोठ्या प्रमाणात फरक आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करणे, हे संविधानाच्या विरोधात आहे. त्यांना आरक्षण द्यावे, परंतु अनुसूचित जमातीतून हे आरक्षण नसावे, त्यासाठी दुसरी सूची असावी, अशी मागणीही त्यांनी केली. (प्रतिनिधी)