खराब हवामानामुळे आदित्य ठाकरे यांचा नाशिक दौरा लांबला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 10:40 IST2019-11-04T10:30:40+5:302019-11-04T10:40:10+5:30

खराब हवामानामुळे धावपट्टीवर विमान उतरविण्यासाठी अडचणी येऊ शकतात हे लक्षात आल्यानंतरआदित्य ठाकरे यांचा दौरा हा एक तास पुढे ढकलण्यात आला

Aditya Thackeray's Nashik visit delayed due to bad weather; Delayed arrival in 1 hour | खराब हवामानामुळे आदित्य ठाकरे यांचा नाशिक दौरा लांबला

खराब हवामानामुळे आदित्य ठाकरे यांचा नाशिक दौरा लांबला

नाशिक- शिवसेनेचे आमदार आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे सोमवारी सकाळी नऊ वाजता नाशिक दौऱ्यावर येऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत होते परंतु जिल्ह्यामध्ये पहाटेपासूनच धुक्याचे सावट असल्यामुळे असल्यामुळे आदित्य ठाकरे यांचा नियोजित सकाळी नऊ वाजता दौरा हा सुमारे एक तास लांबणीवर पडला आहे.

खराब हवामानामुळे धावपट्टीवर विमान उतरविण्यासाठी अडचणी येऊ शकतात हे लक्षात आल्यानंतरआदित्य ठाकरे यांचा दौरा हा एक तास पुढे ढकलण्यात आला सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास आदित्य ठाकरे हे मुंबईहून विमानाने तिकडे प्रयाण करणार होते परंतु बदललेल्या हवामानामुळे हा दौरा पुढे ढकलला असून आता नियोजित वेळेनुसार आदित्य ठाकरे हे मुंबईहून 10 वाजेच्या सुमारास निघणार आहेत आणि सर्वसाधारण पावणे अकरा वाजेपर्यंत ते नाशिकमध्ये पोहोचण्याची शक्यता असल्याचे शिवसेना नेत्यांनी सांगितले त्यानंतर आदित्य ठाकरे हे आपल्या नियोजित कार्यक्रमाप्रमाणे दिंडोरीतील मोहाडी या गावाला भेट देऊन दौऱ्याला सुरुवात करतील

 

Web Title: Aditya Thackeray's Nashik visit delayed due to bad weather; Delayed arrival in 1 hour