माल वाहतूक वाहनांमध्ये प्रवासी आढळल्यास कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 11:41 PM2020-03-29T23:41:54+5:302020-03-29T23:42:42+5:30

सिन्नर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता नाशिक ग्रामीण जिल्ह्याची स्थलसीमा हद्द प्रवासी व माल वाहतुकीसाठी बंद करण्यात आली आहे.

Action to take if a passenger is found in a freight transport vehicle | माल वाहतूक वाहनांमध्ये प्रवासी आढळल्यास कारवाई

सिन्नर येथे माल वाहतूक वाहनांच्या तपासणीप्रसंगी पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह व अधिकारी.

Next
ठळक मुद्देपोलीस अधीक्षक : वाहनांची तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता नाशिक ग्रामीण जिल्ह्याची स्थलसीमा हद्द प्रवासी व माल वाहतुकीसाठी बंद करण्यात आली आहे.
काही टँकर अथवा कंटेनरमधून प्रवासी व्यक्तींची वाहतूक होत असल्याची माहिती पुढे येत आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी ग्रामीण जिल्हा स्थलसीमा हद्दीमध्ये प्रवेश करणाऱ्या व जिल्ह्यातून बाहेर जाणाºया सर्व वाहनांची कसून तपासणी करण्यात यावी व अशा प्रकारे कोणतीही वाहतूक आढळून आल्यास संबंधितावर तत्काळ कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश दिले आहेत. तसेच माल वाहतूकमधून प्रवासी आढळून आल्यास त्याची सर्व माहिती पोलिसांना तत्काळ देण्यात यावी, असे आवाहनदेखील करण्यात आले आहे.

Web Title: Action to take if a passenger is found in a freight transport vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.