लासलगाव : लासलगाव पोलिसांच्या वतीने विशेष मोहीम राबवत सात रोडरोमिओंवर कारवाई करण्यात आली. या प्रकरणी संबधित पोलीस ठाण्यात त्यांच्याविरु ध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.शहरातील गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी तसेच शाळा कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींना होणाºया त्रासातून सुटका करण्यासाठी व रोडरोमिओंचा वाढता सुळसुळाट याचा बिमोड करण्यासाठी सहायक पोलिस निरीक्षक खंडेराव रंजवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे यांनी संयुक्त पणे रोडरोमिओवर धडक कारवाईचा बडगा उगारला.सदर मोहिमेंतर्गत येथील शाळा, महाविद्यालय परिसरातून रोड रोमिओ विरु द्ध सात केसेस करण्यात आल्या असून त्यांच्या कडून १४०० रु पये दंड आकारण्यात आलेला आहे. यापुढे सुद्धा शाळा, कॉलेज परिसरात पेट्रोलिंग करून रोड रोमियो विरु द्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती रंजवे यांनी दिली.
लासलगाव येथे सात रोडरोमिओंवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 19:34 IST
लासलगाव : लासलगाव पोलिसांच्या वतीने विशेष मोहीम राबवत सात रोडरोमिओंवर कारवाई करण्यात आली. या प्रकरणी संबधित पोलीस ठाण्यात त्यांच्याविरु ध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
लासलगाव येथे सात रोडरोमिओंवर कारवाई
ठळक मुद्देरोडरोमिओवर धडक कारवाईचा बडगा