Action on Illegal Sand Fasteners | अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई

आरम नदीपात्रातून महसूल विभागाच्या पथकाने कारवाई करून जप्त केलेले ट्रॅक्टर.

ठळक मुद्देआरम नदी : महसूल पथकाकडून ट्रॅक्टर जप्तीची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
सटाणा : तालुक्यातील निरपूर येथील वाळूमाफियाच्या मुसक्या आवळत असताना महसूल यंत्रणेला चकमा देणाºया आरम नदीपात्रातील वाळूमाफियाचे ट्रॅक्टर बुधवारी (दि.१८) सकाळी तहसीलदारांनी रंगेहाथ पकडून जप्त केले. ट्रॅक्टरवर जप्तीची कार्यवाही करून तहसील कार्यालयात आणले असून, याप्रकरणी १ लाख ३१ हजार ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
बागलाण तालुक्यात गिरणा, आराम, हत्ती, मोसम नदीमध्ये वाळूमाफियांनी अक्षरश: धुमाकूळ घातलेला आहे. निरपूर शिवारात आरम नदीपात्रातून वाळूची अवैध वाळू वाहतूक करणाºया ट्रॅक्टरची गोपनीय माहिती महसूल पथकाला मिळाल्यानंतर बागलाणचे तहसीलदार, जितेंद्र इंगळे पाटील, मेजर भाऊसाहेब मोरे, तलाठी देवकाते, महसूल कर्मचारी लक्ष्मण गवारी, निरपूर येथील आरम नदीपात्रातून वाळूची अवैध वाळू वाहतूक करणाºया ट्रॅक्टरवर महसूल जागते रहो पथकाने बुधवारी कारवाई केली. वाळूसह ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहे.

Web Title: Action on Illegal Sand Fasteners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.