लाखो रुपयांची रद्दी येवल्यात खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 01:10 IST2019-07-29T01:10:13+5:302019-07-29T01:10:41+5:30

नांदगाव रोडलगत मिल्लतनगर भागामध्ये असलेल्या रद्दीच्या गुदामाला आग लागल्याने लाखो रु पयांचा रद्दी कागद, पेपर कटिंग मशिनरी, मोटारसायकल जळून खाक झाली. शॉर्टसर्किटमुळे आग लागून सुमारे आठ ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

 Acknowledging the loss of millions of rupees | लाखो रुपयांची रद्दी येवल्यात खाक

लाखो रुपयांची रद्दी येवल्यात खाक

येवला : नांदगाव रोडलगत मिल्लतनगर भागामध्ये असलेल्या रद्दीच्या गुदामाला आग लागल्याने लाखो रु पयांचा रद्दी कागद, पेपर कटिंग मशिनरी, मोटारसायकल जळून खाक झाली. शॉर्टसर्किटमुळे आग लागून सुमारे आठ ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मिल्लतनगर भागात शेख शब्बीर अब्दुल गफूर घासी यांचे रद्दी कागद कटिंग उद्योग आहे. रविवारी पहाटे तीनच्या सुमारास गुदामाला आग लागल्याचे नागरिकांना दिसले. आगीने क्षणात रौद्र रूप धारण केल्याने गुदामाशेजारी उभ्या मोटारसायकलने पेट घेतला. सहा तासाच्या शर्तीच्या प्रयत्नांतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना यश आले. सुमारे सहा ते सात तासाच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर अग्निशामक दलास आगीवर नियंत्रण मिळविता आले.

Web Title:  Acknowledging the loss of millions of rupees