भुसावळ येथील दुहेरी हत्याकांडातील आरोपी नाशिकमध्ये जेरबंद 

By दिनेश पाठक | Updated: May 31, 2024 13:59 IST2024-05-31T13:59:18+5:302024-05-31T13:59:36+5:30

भुसावळ येथील मरिमाता मंदिरासमोर गोळीबार झाला होता. संतोष बारसे व सुनील राखुंडे हे कारमधून जात असताना त्यांच्यावर गोळीबार झाला होता. या घटनेत या दोघांचाही मृत्यू झाला...

Accused in Bhusawal double murder case jailed in Nashik  | भुसावळ येथील दुहेरी हत्याकांडातील आरोपी नाशिकमध्ये जेरबंद 

भुसावळ येथील दुहेरी हत्याकांडातील आरोपी नाशिकमध्ये जेरबंद 

नाशिक : भुसावळ (जि. जळगाव) येथे बुधवारी (दि.२९) रात्री दहा वाजता झालेल्या दुहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपीस नाशिकमध्ये जेरबंद करण्यात यश आले. घटना घडल्यानंतर २४ तासात नाशिकच्या गुंडा विरोधी पथकाने आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

भुसावळ येथील मरिमाता मंदिरासमोर गोळीबार झाला होता. संतोष बारसे व सुनील राखुंडे हे कारमधून जात असताना त्यांच्यावर गोळीबार झाला होता. या घटनेत या दोघांचाही मृत्यू झाला. त्यानंतर मुख्य आरोपी हा भुसावळमधून फरार झाला. नाशिकच्या भद्रकाली पोलिस स्टेशन हद्दीत द्वारकानजीक बोहरी पेट्रोल पंपाजवळ करण किसन पतरोड (२० रा. भुसावळ) हा गुंडाविरोधी पथकाला संशयितरित्या फिरताना आढळून आला. पोलिसांना पाहताच त्याने धूम ठोकली, परंतु गुंडाविरोधी पथकाने त्याचा सिनेस्टाईल पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. 

त्याची चौकशी केली असता त्याने भुसावळमध्ये दुहेरी हत्याकांड केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून दोन पिस्तूल तसेच पाच काडतूस जप्त करण्यात आले आहे.
 

Web Title: Accused in Bhusawal double murder case jailed in Nashik