अल्पवयीन मुलीसह आरोपी पोलिसात हजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 00:32 IST2018-04-13T00:32:14+5:302018-04-13T00:32:14+5:30

मालेगाव : तालुक्यातील चंदनपुरी येथील अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याच्या प्रकरणात बुधवारी मुलीस पळवून नेणारा आरोपी सुजित अहिरे व अल्पवयीन मुलगी स्वत:हून किल्ला पोलिसांच्या स्वाधीन झाले. पोलिसांनी मुलीस तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले तर आरोपी सुजितला अटक केली.

The accused, along with a minor girl, will appear in the police | अल्पवयीन मुलीसह आरोपी पोलिसात हजर

अल्पवयीन मुलीसह आरोपी पोलिसात हजर

ठळक मुद्दे पोलिसांनी मुलीस तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केलेसंतप्त कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला

मालेगाव : तालुक्यातील चंदनपुरी येथील अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याच्या प्रकरणात
बुधवारी मुलीस पळवून नेणारा आरोपी सुजित अहिरे व अल्पवयीन मुलगी स्वत:हून किल्ला पोलिसांच्या स्वाधीन झाले. पोलिसांनी मुलीस
तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले तर आरोपी सुजितला अटक केली.
चंदनपुरी येथील अल्पवयीन मुलीस पळवून नेण्याचा प्रकार घडला होता. मुलीची आई पोलिसात तक्रार देण्यासाठी गेली असता तिच्या वडिलांनी बदनामीच्या भीतीने आत्महत्या केली होती. यामुळे संतप्त कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला
होता तर सोमवारी चंदनपुरीत बंदही पाळण्यात आला होता.
या अपहरण प्रकरणात पोलिसांनी आरोपी सुजितचे आई, वडील, बहीण अशा सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली होती. बुधवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलीसह आरोपी सुजित किल्ला पोलिसात स्वत:हून हजर झाल्याची माहिती मालेगाव पोलीस ठाण्याच्या सूत्रांनी दिली.

Web Title: The accused, along with a minor girl, will appear in the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा