शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

एकवटलेले खातेप्रमुख तालुक्यांना पिटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:45 IST

खातेप्रमुख खदखद प्रकरण : निमित्त संपर्क अभियानाचे

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हा परिषदेत बदलून आलेले मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांच्या विरोधात पदोपदी अपमानास्पद वागणूक देत असल्याचे कारण देत सर्व खातेप्रमुख एकत्र आल्याची चर्चा असतानाच, सर्व खातेप्रमुखांना पंधरा तालुक्यांमध्ये संपर्क अभियानाच्या निमित्ताने मंगळवारी (दि.१८) प्रशासनाच्या वतीने तातडीने पिटाळण्यात आल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात होती. गेल्या दोन महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेत बदलून आलेले मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांनी आल्या आल्याच कर्मचारी व अधिकाऱ्यांवर शिस्तीचा बडगा उगारला होता. इतकेच नव्हे तर आजी-माजी सदस्यांच्या चारचाकी वाहनांना जिल्हा परिषदेच्या आवारात बंदी घालत वाद ओढवून घेतला होता. लोकप्रतिनिधींमध्ये सीईओंबाबत नाराजी असतानाच सर्व खातेप्रमुखांमध्येही त्यांच्याबाबत हळूहळू नाराजी वाढल्याची चर्चा आहे. काही वेळा बैठकांमधून थेट खातेप्रमुखांना अपमानास्पद वागणूक देणे, खातेप्रमुखांना स्वत:च त्यांच्या नस्त्या आणण्याचे आदेश व वेळेत नस्त्या न काढण्यासह आढावा बैठकांमधून वारंवार खातेप्रमुखांना निरुत्तर करणे, यांसह अन्य बाबींमुळे दुखावलेले खातेप्रमुख मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांविरोधात दुखावल्याची चर्चा होती. त्यातच दोन दिवसापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सर्वच खातेप्रमुखांची सेवापुस्तके त्यांच्या सरकारी निवासस्थानी नेल्याची चर्चा आहे. त्यामुळे दुखावलेले सर्व खातेप्रमुख एकत्र येऊन त्यांनी याबाबत थेट विभागीय आयुक्तांकडेच न्याय मागण्याची भूमिका घेतल्याचे कळते. या एकूणच घडामोडींबाबत माध्यमांमध्ये वृत्त प्रकाशित होताच मंगळवारी जिल्हा परिषदेच्या खातेप्रमुखांमध्ये चलबिचल सुरू झाली.कामकाजाचा आढावा घेण्याचे आदेशखातेप्रमुख एकत्र येत असल्याचे चित्र असतानाच मंगळवारी सर्वच खातेप्रमुखांना मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांनी नेमून दिलेल्या तालुक्यांमध्ये जाऊन संपर्क अधिकारी म्हणून तत्काळ कामकाजाचा आढावा घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे मंगळवारी सकाळपासूनच सर्व खातेप्रमुख त्यांना नेमून दिलेल्या तालुक्यांमध्ये जाऊन पंचायत समितीत कामकाजाचा आढावा घेऊन सायंकाळी जिल्हा परिषदेत परतल्याचे चित्र होते.