कंटेनरच्या धडकेने दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2021 01:13 IST2021-12-09T01:12:33+5:302021-12-09T01:13:07+5:30

तारवालानगरकडून अमृतधामकडे जाणाऱ्या दुचाकीस्वाराला हिरावाडीतील गुंजाळबाबानगर विहान हॉटेलजवळ भरघाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात आडगाव शिवारात राहणारा दुचाकीस्वार दीपक विलास चव्हाण (४५) याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली.

Accidental death of two-wheeler due to container collision | कंटेनरच्या धडकेने दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू

कंटेनरच्या धडकेने दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू

चवटी : तारवालानगरकडून अमृतधामकडे जाणाऱ्या दुचाकीस्वाराला हिरावाडीतील गुंजाळबाबानगर विहान हॉटेलजवळ भरघाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात आडगाव शिवारात राहणारा दुचाकीस्वार दीपक विलास चव्हाण (४५) याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली. याबाबत नांदेड जिल्ह्यातील कंटेनर चालकाविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विल्लोळी येथे राहणाऱ्या मंगेश सुभाष दांडगे यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. काल मंगळवारी रात्री अकरा वाजेच्या सुमाराला आडगाव शरयू पार्क येथे राहणारे दीपक चव्हाण हे त्यांच्या ताब्यातील दुचाकीवरून (क्रमांक एमएच१५ एफएच ०२५६) तारवालानगरकडून अमृतधाम बाजूकडे जात असताना विहान हॉटेलजवळ पुलावर कंटेनरने (क्रमांक डी.एन ९० आर ९७९९) समोरून त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. त्यात चव्हाण यांच्या डोक्याला, हाता-पायाला गंभीर मार लागल्याने त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तेथे डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले असल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघाताच्या घटनेनंतर कंटेनर चालकाने घटनास्थळाहून पलायन केले.

Web Title: Accidental death of two-wheeler due to container collision