Accidental death of policewoman Madge of Ghodwadi | घोडेवाडीचे पोलीसपाटील मदगे यांचे अपघाती निधन
घोडेवाडीचे पोलीसपाटील मदगे यांचे अपघाती निधन

सिन्नर : येथील आडवा फाटा भागात दोन वाहनांच्या अपघातात एक ठार तर एकजण जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि.९) दुपारी चारच्या सुमारास घडली. या अपघातात मिथुन नारायण मदगे (३२, रा. घोडेवाडी-चंद्रपूर, ता. सिन्नर) असे मृताचे नाव असून, मदगे हे घोडेवाडीचे पोलीस पाटील आहेत.
मिथुन मदगे व बबन बाळू घोडे हे दोघे स्प्लेंडर दुचाकीने (एमएच १५, जीवाय ९२३०) जात असताना सदर अपघात झाला. त्यात मदगे यांचा जागीच मृत्यू झाला तर घोडे जखमी झाले. जखमीवर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सहायक पोलीस उपनिरीक्षक गणेश परदेशी अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Accidental death of policewoman Madge of Ghodwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.