२ जैन साध्वी महिलांचा अपघाती मृत्यू, कसारा घाटात पहाटे झाला अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 11:18 IST2023-06-08T11:17:49+5:302023-06-08T11:18:26+5:30

कसारा घाटातून नाशिक येथील पवननगर स्थानकात चातुर्मास कार्यक्रमासाठी जाताना हा अपघात झाला.

Accidental death of 2 Jain Sadhvi women, early morning accident at Kasara Ghat | २ जैन साध्वी महिलांचा अपघाती मृत्यू, कसारा घाटात पहाटे झाला अपघात

२ जैन साध्वी महिलांचा अपघाती मृत्यू, कसारा घाटात पहाटे झाला अपघात

इगतपुरी (नाशिक)- नाशिक - मुंबई नाशिक महामार्गावर कसारा घाटातील हॉटेल आँरेज समोर गुरुवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास कंटेनरच्या धडकेत दोन जैन महिला साध्वी यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

कसारा घाटातून नाशिक येथील पवननगर स्थानकात चातुर्मास कार्यक्रमासाठी परम पूज्य श्री सिद्धाकाजी म सा व परमपूज्य श्री हर्षाईकाजी महाराज ह्या पहाटेच्या सुमारास नाशिकला पायी प्रवास करत होत्या. यावेळी एका कंटेनरने पिकअपला आणि ओमनी कारला धडक दिल्यानंतर पायी चालणाऱ्या महिला साध्वी यांना धडक दिली. त्यांचा या अपघातात जागेवरच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. यामुळे इगतपुरी तालुक्यातील जैन बांधवांमध्ये शोक व्यक्त होत आहे.

Web Title: Accidental death of 2 Jain Sadhvi women, early morning accident at Kasara Ghat

टॅग्स :Nashikनाशिक